Realme GT 6T च्या भारतातील लाँचच्या तारखेची झाली घोषणा, जाणून घ्या काय आहे तारीख

भारताचा पहिला Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट असलेला फोन 22 मे ला लाँच होईल. रियलमी ब्रँड द्वारे आणला जाणारा Realme GT 6T स्मार्टफोन खूप काळानंतर कंपनी भारतात आपला ‘जीटी’ सीरीज घेऊन येत आहे जो पावरफुल परफॉर्मन्स देईल. काही दिवसांपूर्वी फोनला टिझ केल्यानंतर आज ब्रँडकडून याची लाँच माहिती पण शेअर करण्यात आली आहे.

Realme GT 6T भारतातील लाँचची माहिती

रियलमीने भारतात अधिकृत घोषणा करत सांगितले आहे की रियलमी जीटी 6 टी 22 मे ला भारतात लाँच होईल. या दिवशी कंपनी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करेल जो दुपारी 12 वाजता सुरु होईल. या कार्यक्रमाच्या मंचावरून Realme GT 6T ची किंमत आणि स्पेसिफिकेशन अधिकृत केले जातील. तसेच ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनवर पण फोनचे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. रियलमी जीटी 6 टी लाँचचा कार्यक्रम सर्व रियलमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहिला जाऊ शकतो.

Realme GT 6T किंमत (लीक)

  • 8GB RAM + 128GB Storage = ₹29,999
  • 8GB RAM + 256GB Storage = ₹31,999
  • 12GB RAM + 256GB Storage = ₹33,999
  • 12GB RAM + 512GB Storage = ₹35,999

रियलमी जीटी 6 टी बद्दल समोर आले आहे की हा मोबाईल 4 व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. लीकनुसार फोनच्या 8 जीबी+128 जीबी बेस व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये असेल. तसेच 8 जीबी+256 जीबी 31,999 रुपयांमध्ये, 12 जीबी+256 जीबी व्हेरिएंट 33,999 रुपये तसेच 12 जीबी+512 जीबी व्हेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. फोनची खऱ्या किंमतीची माहिती मिळवण्यासाठी 22 मे ची वाट पाहावी लागणार आहे.

realme GT 6T चे परफॉर्मन्स

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की ​अगामी रियलमी जीटी 6 टी स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर वर लाँच केला जाईल. रियलमीकडून फोनचा Antutu score पण शेअर करण्यात आला आहे जो 1.5 मिलियन पेक्षा अधिक मिळाला आहे. ही 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे जी 2.8GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

realme GT 6T स्पेसिफिकेशन (लीक)

डिस्प्ले : रियलमी जीटी 6 टी स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले पाहायला मिळू शकते जो 1.5 के रेजोल्यूशन असणार आहे. या फोनमध्ये ओएलईडी स्क्रीनचा वापर केला जाऊ शकतो ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स ब्राईटनेस मिळण्याची शक्यता आहे.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. याच्या बॅक पॅनलवर ओआईएक टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स 882 सेन्सर तसेच 8 मेगापिक्सल अल्ट्रावाईड आयएमएक्स 355 लेन्स मिळण्याची शक्यता आहे.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी Realme GT 6T स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या मोबाईलमध्ये कंपनी सोनी आयएमएक्स 615 सेन्सरचा वापर करू शकते.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी अगामी रियलमी जीटी 6 टी मध्ये 5,500 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच हा मोबाईल 100 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here