फक्त 49 रुपयांमध्ये एयरटेल देत आहे 3जीबी 4जी डेटा

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने काही दिवसांपूर्वीच 249 रुपयांचा नवीन प्लान सादर केला होता, ज्यात एक महिन्यासाठी 56जीबी 4जी डेटा मिळत आहे. तसेच आता कंपनी ने कमी वॅलिडिटी वाल्या प्लान मध्ये अजून एक नवीन बदल केला आहे. एयरटेल ने 49 रूपयांचा प्लान सादर केला आहे जो यूजर्सना 4जी स्पीड वर 3जीबी डेटा देत आहे.

एयरटेल चा हा 49 रुपयांचा प्लान एक जुना प्लान आहे पण आता कंपनी ने यात बदल केला आहे. हा प्लान फक्त 1 दिवसाच्या वॅलिडिटी सह येतो. आधी या प्लान मध्ये 1 दिवस म्हणजे 24 तासांसाठी 1जीबी डेटा दिला जात होता, पण नवीन बदला नंतर 1जीबी डेटा ऐवजी 3जीबी डेटा मिळेल.

एयरटेल कडून मिळणारा 3जीबी डाटा 4जी स्पीड वर वापरता येतो. कंपनी ने हा प्लान डेटा प्लान च्या रुपात सादर केला आहे त्यामुळे हा फक्त इंटरनेट बेनिफिट देईल.

तसेच एयरटेल ने काही दिवसांपूर्वी आपल्या 349 रुपयांच्या प्लान मध्ये पण बदल केला आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. आधी या प्लान अंतर्गत प्रत्येक दिवशी 2.5जीबी 4जी डेटा मिळत होता पण आता एयरटेल कडून प्रति​दिन 3जीबी 4जी इंटरनेट डेटा दिला जात आहे.

मीजू ने लॉन्च केले 3 नवीन स्मार्टफोन, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह स्पेसिफिकेशन्स आहेत दमदार

एयरटेल कडून या प्लान मध्ये लोकल व नॅशनल वॉयस कॉल पूर्णपणे मोफत मिळत आहेत ज्याचा वापर रोमिंग मध्ये पण करता येईल. तसेच प्लान अंतर्गत प्रत्येक दिवशी एयरटेल यूजर्सना 100 एसएमएस पण मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here