मीजू ने लॉन्च केले 3 नवीन स्मार्टफोन, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह स्पेसिफिकेशन्स आहेत दमदार

मीजू च्या बाबतीत खुप काळा पासून चर्चा चालू होती कि साल 2018 मध्ये कंपनीला 15 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि मीजू आपल्या 15वा वर्धापनदिनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. त्यानुसार मीजू ने तीन नवीन स्मार्टफोन मीजू 15, मीजू 15 प्लस आणि मीजू 15 लाइट अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केले आहेत. मीजू ने हे तिन्ही स्मार्टफोन 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत जे सध्‍यातरी चीनी बाजारात सादर करण्यात आले आहेत. हे फोन 29 एप्रिल पासून सेल साठी उपलब्ध होतील.

मीजू 15 5.46-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिसप्ले वर सादर केला गेला आहे तर मीजू 15 प्लस 5.95-इंचाच्या क्यूएचडी एमोलेड डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मीजू 15 फ्लॅग ओएस आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो तसेच यात एड्रेनो 512जीपीयू आहे. तर मीजू 15 प्लस सॅमसंग च्या एक्सनॉस 8895 चिपसेट वर चालतो तसेच यात माली जी71 जीपीयू देण्यात आला आहे.

मीजू 15 ला कंपनी ने 4जीबी रॅम सह सादर केले आहे जो 64जीबी व 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध होईल तर मीजू 15 प्लस मध्ये 6जीबी चा पावरफुल रॅम आहे आणि हा 64जीबी व 128जीबी मेमरी वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी साठी मीजू 15 तसेच मीजू 15 प्लस दोन्ही स्मार्टफोन मध्ये 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एआई टेक्निक आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो 12-मेगापिक्सल सोनी आईएमएक्स 380 आणि 20-मेगापिक्सल सोनी आईएमएक्स 350 च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो.

4जी वोएलटीई, फिंगरप्रिंट सेंसर तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह मीजू 15 मध्ये 3,000एमएएच तसेच मीजू 15 प्लस मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

तर मीजू 15 लाइट बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 5.46-इंचाच्या एलसीडी डिसप्ले वर लॉन्च झाला आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 626 प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12-मेगापिक्सल चा रियर आणि 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी आहे.

मीजू 15 च्या 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट ची किंमत 2,499 चीनी युआन (जवळपास 26,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर फोन च्या 4जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 2,799 चीनी युआन (जवळपास 29,400 रुपये) च्या किंमतीवर लॉन्च केला गेला आहे.

मीजू 15 प्लस च्या 6जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 2,999 चीनी युआन (जवळपास 31,500 रुपये) तसेच 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 चीनी युआन (जवळपास 34,700 रुपये) ठेवण्यात आली आहे.
मीजू 15 लाइट 1,699 चीनी युआन च्या किमतींवर लॉन्च केला गेला आहे जो भारतीय करंसी नुसार जवळपास 17,800 रुपये असेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here