एकच नंबर! Airtel युजर्सना मिळतोय मोफत 2GB डेटा; 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर भन्नाट ऑफर

Highlights

  • Airtel Thanks अ‍ॅप युजर्सना मिळेल 2GB फ्री डेटा
  • 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर मिळेल फ्री डेटा
  • काही प्लॅन्समध्ये OTT बेनेफिट्सचा समावेश

जियोला टक्कर देण्यासाठी Airtel नेहमीच आकर्षक ऑफर्ससाधार करत असते. आता देखील कंपनीनं एक शानदार ऑफर आपल्या ग्राहकांसाठी सादर केली आहे. या ऑफर अंतगर्त Bharti Airtel आपल्या ग्राहकांना 2GB फ्री डेटा देत आहे. विशेष म्हणजे कंपनीनं आपल्या 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर 2GB फ्री डेटा देण्याची घोषणा केली आहे. परंतु कंपनीची ही वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली नाही तसेच सर्वांसाठी उपलब्ध नाही. यात एक मोठी अट आहे ती पुढे जाणून घेऊया.

Airtel आपल्या 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह 2GB डेटा मोफत देत आहे. यात 58 रुपये, 65 रुपये, 98 रुपये, 265 रुपये, 359 रुपये, 549 रुपये, 699 रुपये, 719 रुपये आणि 839 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. हा अतिरिक्त डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे रिचार्ज करण्यासाठी कंपनीच्या Airtel Thanks अ‍ॅपचा वापर करावा लागेल. पेटीएम, गुगल पे, फोनपे किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून देखील रिचार्ज केल्यास हा मोफत डेटा मिळणार नाही. हे देखील वाचा: लाँच पूर्वीच आली Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची किंमत; पाहा आहे का तुमच्या बजेटमध्ये?

Airtel च्या या प्लॅन्सवर मिळतोय मोफत 2GB Data

58 रुपये, 65 रुपये आणि 98 रुपयांचे प्लॅन्स डेटा व्हाऊचर आहेत. ज्यात युजर्सना अनुक्रमे 3GB, 4GB आणि 5GB डेटा मिळतो. 265 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना डेली 1GB डेटा मिळतो, या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. ऑफर अंतर्गत आता या प्लॅन्समध्ये 2 जीबी डेटा जास्त मिळेल. 359 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2GB डेटा 28 दिवसांसाठी मिळत आहे. हा प्लॅन देखील 2GB मोफत डेटासाठी पात्र आहे.

549 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2GB डेटा 56 दिवसांची वॅलिडिटी मिळते. ऑफर अंतगर्त आता या प्लॅनयामध्ये देखील 2 जीबी डेटा मोफत मिळेल. 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 3GB डेटा आणि 56 दिवसांची वॅलिडिटी देण्यात आला आहे. तसेच यात Amazon Prime चे सब्सक्रिप्शन देखील कंपनी देत आहे. आता यात 2GB फ्री डेटा मिळेल. हे देखील वाचा: Amazon Great Republic Day Sale: या आहेत बेस्ट स्मार्ट टीव्ही डील्स, घरच्या घरी थिएटरची मजा

719 रुपयांचा प्लॅनमध्ये डेली 1.5GB डेटा 84 दिवसांची वॅलिडिटी मिळते. ऑफर अंतगर्त आता यात 2 जीबी अतिरिक्त डेटाची भर पडेल. हा प्लॅन SonyLIV,Erosnow चे सब्सक्रिप्शन देतो. 839 रुपयांचा प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह मिळतो. आता यात 2GB डेटा फ्री मिळेल. या प्लॅन सोबत 3 महिन्याचे Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here