Home बातम्या Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे

Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे

Highlights
  • Amazon Prime Membership महागली आहे.
  • 1 महिना आणि 3 महिन्यांच्या प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे.
  • Prime Video वर फिल्म व सीरीज पाहणं महाग झालं आहे.

Amazon नं आपल्या भारतीय युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Prime Membership ची किंमत वाढवली आहे आणि आपल्या सर्व्हिसेज महाग केल्या आहेत. याआधी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि आता कंपनीनं आपल्या मासिक प्लॅनचा रेट देखील वाढवला आहे. नवीन किंमतीनंतर Prime Video वर चित्रपट व वेब सीरीज बघणं महाग होईल.

किती महागले अ‍ॅमेझॉन प्राइम प्लॅन्स

नवीन अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

हे देखील वाचा: Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड

जुना अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

अ‍ॅमेझॉननं मासिक आणि तिमाही प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 1 महिना वैधता असलेला मासिक प्लॅन आधी 179 रुपयांचा होता जो आता 299 रुपयांचा झाला आहे. तर 3 महिन्यांच्या तिमाही प्लॅनची किंमत आधी 459 रुपये होती ती आता दरवाढीनंतर वाढून 599 रुपये झाली आहे. Amazon Prime च्या वार्षिक प्लॅनची किंमत मात्र बदलण्यात आली नाही. हे देखील वाचा: आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप मधील फायदे

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपमध्ये प्राइम शिपिंगचा फायदा मिळतो. तसेच प्राइम व्हिडीओवर वेब सीरिज आणि चित्रपट बघता येतात. प्राइम म्युजिकच्या माध्यमातून जाहिरातरहित गाणी ऐकता येतात. तसेच प्राइम मेंबर्ससाठी खास डील्स आणि ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, प्राइम गेमिंग, प्राइम रिडींग आणि अ‍ॅमेझॉन फॅमिलीचे बेनिफिट्स मिळतात.