Android 11 झाला रिलीज, OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme च्या या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट

Google ने जून मध्ये आपली लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम Android 11 सादर केली होती. तेव्हा एंडरॉयड 11 चा बीटा वर्जन रोलआउट झाला होता ज्यात एंडरॉयड 11 चे नवीन व एडवांस फीचर्स टेस्ट करण्याची संधी मिळाली होती. आज गूगलने अधिकृतपणे एंडरॉयड 11 लॉन्च केला आहे. नेहमी एंडरॉयड 11 चा अपडेट सर्वात आधी गूगल पिक्सल स्मार्टफोन्सना मिळतो पण यावेळी Android 11 चा स्टेबल वर्जन पिक्सल सोबतच OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme स्मार्टफोन्सना पण दिला जात आहे.

थेट त्या स्मार्टफोन्स बद्दल बोलूया ज्यांना सर्वात आधी Android 11 चा स्टेबल वर्जन मिळेल, या लिस्ट मध्ये सर्वात पहिली नावे Google Pixel 2, Google Pixel 3, Google Pixel 3A, Google Pixel 4 आणि Google Pixel 4A ची आहेत. तसेच एंडरॉयड 11 चा अपडेट सर्वात आधी मिळवणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये वनप्लसच्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro स्मार्टफोनचा पण समावेश असेल. वनप्लसने पण अधिकृतपणे ऑक्सिजन 11 ची घोषणा केली आहे.

त्याचप्रमाणे ओपोच्या OPPO Find X2 आणि OPPO Reno 3 ला नवीन एंडरॉयड इतरांच्या आधी मिळेल. विशेष म्हणजे येत्या 14 सप्टेंबरला ओपोने एंडरॉयड 11 आधारित नवीन कलरओएस लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त शाओमीचे Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 10 Pro स्मार्टफोन तसेच रियलमीचा Realme X50 Pro स्मार्टफोन त्या मोबाईल्सच्या यादीत आहे ज्यांना इतर स्मार्टफोन्सच्या आधी एंडरॉयड 11 चा लेटेस्ट अपडेट मिळेल.

Android 11

गूगलने नवीन एंडरॉयड 11 मध्ये अनेक असे फीचर्स टाकले आहेत जे स्मार्टफोन एक्सपीरियंस ऍडव्हान्स बनवतात. नवीन एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मोबाईल यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन एंडरॉयड 11 चे फीचर्स कंपनीने तीन भागांत विभागले आहेत ज्यात People, Control आणि Privacy चा समावेश आहे.

उदाहरणार्थ conversations मध्ये यूजर आपल्या मर्जीनुसार ठरवू शकतील कि त्यांना मेसेजिंग ऍप मध्ये कोणाशी बोलायचे आहे आणि कोणाचे मेसेज ओपन न करता नोटिफिकेशन्स मधेच ठेवायचे आहेत. कॉन्वर्सेशन फीचर्सचा वेगळा सेक्शन बनवण्यात आला आहे, ज्यात रीसीव झालेल्या मेसेजेस पैकी तुम्ही तुमच्या आवडीच्या लोकांशी बोलू शकाल. तसेच Bubbles फीचरच्या माध्यमातून मेसेज फ्लोटिंग बबल द्वारे ऍक्सेस करता येईल.

Voice Access आणि Keyboard Suggestion सारख्या फीचर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन यूजर्सना मल्टी टास्किंग मध्ये मदत मिळेल. एंडरॉयड 11 मध्ये ऑन-डिवाइस विजुअल कॉर्ट्रेक्स देण्यात आला आहे जो स्क्रीन वरील कन्टेन्ट आणि कॉन्टेक्स्ट समजून कमांड्स घेऊ शकेल. तसेच Android 11 सह एक्सटर्नल Device Control फीचर्स पण सादर केला गेला आहे. आता स्मार्ट डिवाईसेज जसे कि स्मार्टटीव्ही, ब्लूटूथ हेडफोन व स्पीकर्स तसेच इतर होम अप्लाइअन्सशी तुम्ही सहज कनेक्ट करू शकाल आणि रिमोटली ते कंट्रोल पण करू शकाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here