5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

असूस येत्या 11 डिसेंबरला आपली झेनफोन सीरीज अजून पावरफुल बनवत एक नवीन डिवाईस झेनफोन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची सुरवात इंडोनेशिया पासून करणार आहे ज्याबद्दल कंपनी ने ईमेज टीजर पण जारी केला आहे. काही दिवसांपूर्वी असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनलचा लुक शेयर करून फोनच्या नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा सेग्मेंटची माहिती दिली होती तर आता एका नवीन ईमेज मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी असल्याची बाब समोर आली आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची एक टीजर ईमेज इंटरनेट वर वायरल झाली आहे ज्यात 5,000एमएएच बॅटरीचा उल्लेख करण्यात आला आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम2 बद्दल हे कंफर्म झाले आहे कि असूस हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करेल जी क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. तसेच असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 नॉच डिस्प्ले लॉन्च केला जाईल हे पण असूस आधीच सांगितले आहे.

ASUS Zenfone Max Pro M2

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम देईल सोबत हा 64जीबी तसेच 128जीबी स्टोरेजच्या दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. तर काही रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे कि असूस भारतात झेनफोन मॅक्स प्रो एम2 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीकनुसार असूसचा हा फोन एंडरॉयड ओरियो वर सदर केला जाईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा सेंसर मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा असेल. तसेच झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार असल्याचे समोर आले आहे.

असूस 11 डिसेंबरला हा फोन इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च करेल. अशा आहे कि अंर्तराष्ट्रीय लॉन्च नंतर काही दिवसांनी कंपनी झेनफोन मॅक्स प्रो एम2 भारतीय बाजारात आणेल. झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची किंमत किती असेल याबद्दल आता बोलणे चुकीचे ठरेल. चर्चा अशी आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी634केएल मॉडेल नंबर सह भारतीय बाजारात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here