जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेल्या Vivo S9 5G चे फुल स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच करेल एंट्री

Vivo जगातील पहिला मीडियाटेक डाइमेंसिटी 1100 एसओसी असलेला फोन Vivo S9 लॉन्च करण्याच्या खूप जवळ पोहोचली आहे. 5G सपोर्टसह कंपनी हा डिवाइस आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये 6 मार्चला सादर करेल. लॉन्चबद्दल कंपनीने अजूनतरी अधिकृत माहिती दिली नाही. आता ऑफिशियल लॉन्चच्याआधी Vivo S9 5G च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. हा लेटेस्ट लीक Digital Chat Station आणि Arsenal ने शेयर केला आहे, ज्यात फोनच्या जवळपास सर्व फीचर्सचा खुलासा झाला आहे.

Digital Chat Station नुसार वीवो एस9 5जी मध्ये 44MP डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप दिला जाईल. तर, मागे तीन कॅमेरा सेंसर असतील. याआधी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि मागे 64एमपीचा प्राइमरी कॅमेरा असेल. तसेच फोनची कॅमेरा डिजाइन Vivo V20 Pro प्रमाणे असेल.

हे देखील वाचा : Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12

Arsenal ने वीबोवर या अपकमिंग स्मार्टफोनची माहिती देत सांगितले आहे कि या फोन मध्ये 6.44-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट असेल. फोन मध्ये 44MP प्राइमरी फ्रंट कॅमेरा आणि अल्ट्रावाइढ लेंस वाइड नॉचसह असेल.

फोन फ्लॅट aluminium फ्रेमसह येईल. फोन 7.31mm थिक आणि याचे वजन फक्त 168 ग्राम असेल. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये 4,000mAh बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग असेल.

हे देखील वाचा : फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा

Vivo S9 8GB/ 12GB रॅमसह 128GB/ 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. अलीकडेच वीवोचा एक फोन मॉडेल नंबर V2072A सह गुगल प्ले कंसोलवर दिसला होता. या लिस्टिंगवरून खुलासा झाला होता कि वीवोच्या आगामी फोन मध्ये डाइमेंसिटी 1100 (MT6891 मॉडेल नंबर) चिपसेट असेल. अंदाजानुसार हा डिवाइस Vivo S9 5G असेल.

स्मार्टफोन मध्ये 33W फास्ट चार्जिंगसाठी 4,000mAh ची बॅटरी असेल आणि हा एंड्रॉइड 11 आधारित ओरिजिन ओएसवर चालेल. विशेष म्हणजे मॉडेल नंबर V2072A असलेला फोन 3C सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला होता, ज्यात 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टची माहिती समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here