या वर्षीची सर्वाधिक प्रतिक्षित असलेली स्मार्टफोन सीरीज Apple iPhone 16 सादर करण्यात आली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने एकूण चार मॉडेल्स सादर केले आहेत, ज्यात Apple iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. तथापि, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला या सीरीजच्या दोन मोठे मॉडेल्स iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांची माहिती देणार आहोत, त्याआधी तुम्हाला सांगतो की हे हँडसेट Apple 3nm A18 Pro चिपसेट आणि ग्रेड 5 टायटॅनियम बिल्डने बनलेले आहेत. चला पुढे तुम्हाला कंपनीच्या दोन्ही धमाकेदार फ्लॅगशिप फोनची किंमत, विक्रीची तारीख आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन याविषयी आणखी माहिती देऊ.
iPhone 16 आणि iPhone 16 Plus बद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
या वर्षाच्या प्रो मॉडेल्ससह ॲपल ने एक नवीन ‘कॅप्चर’ बटण जोडले जे डीएसएलआरवरील शटर बटणासारखे कार्य करते. iPhone 16 Pro आणि Pro Max देखील मोठे डिस्प्ले पण पातळ बेझलसह येत आहेत. त्याचवेळी, प्रो मॉडेलसाठी नवीन ‘डेझर्ट टायटॅनियम’ गोल्ड कलर देखील आला आहे.
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची किंमत
- आयफोन 16 प्रो ची किंमत (128 जीबी स्टोरेज मॉडेलची) 1,19,900 रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन 16 प्रो मॅक्स ची किंमत (256 GB स्टोरेज मॉडेलसाठी) 1,44,900 रुपयांपासून सुरू होते.
- आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स शुक्रवारपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होतील आणि 20 सप्टेंबरपासून विक्री सुरू केली जाईल.
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चे डिझाईन आणि रंग पर्याय
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चे डिझाईन गेल्या वर्षीच्या मॉडेल्ससारखेच आहे, परंतु ते उंच आणि रुंद आहेत. प्रो मॉडेलमधील मोठ्या डिस्प्लेमुळे असे झाले आहे. iPhone 16 Pro चा डिस्प्ले 6.1 इंचावरून 6.3 इंचापर्यंत झाला आहे, तर Pro Max चा डिस्प्ले 6.7 इंचावरून 6.9 इंचापर्यंत झाला आहे. तथापि, दोन्ही फोनचे बेझल पातळ आहेत आणि त्यांचे वजन देखील समान आहे.
iPhone 15 Pro सीरीजप्रमाणे नवीन जनरेशन मध्ये देखील ॲक्शन बटण आहे ज्याने डावीकडील म्यूट स्विचची जागा घेतली आहे. त्याचवेळी, उजव्या बाजूला एक नवीन कॅप्चर बटण देखील आहे, जे साईड पॅनेलमध्ये मिळून जाते. ॲपल ने iPhone 16 Pro सीरीजसाठी नवीन गोल्ड ‘डेझर्ट टायटॅनियम’ रंग देखील सादर केला आहे. जो गेल्या वर्षीच्या ब्लू टायटॅनियमची जागा घेतो. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांना डेझर्ट टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, ब्लॅक टायटॅनियम आणि नॅचरल टायटॅनियम कलर पर्यायांमध्ये सादर केले गेले आहे.
Apple इंटेलिजन्स
यावेळी नवीन ॲपलची खासियत म्हणजे त्यात ॲपल इंटेलिजन्स आहे. म्हणजेच तुम्हाला iOS 18 मध्ये AI फिचर्स मिळतील. वास्तविक, तुम्हाला सर्व फिचर्स एकाच ठिकाणी मिळतील ज्याला “ॲपल इंटेलिजन्स” म्हणून ओळखले जाईल. याशिवाय क्युपर्टिनो ची दिग्गज कंपनीचा ऑन-डिव्हाईस आणि सर्व्हर-प्रोसेसिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करेल. त्याचवेळी, ॲपल इंटेलिजन्स वापरकर्त्यांना सिग्नलवर आधारित जलद मजकूर लिहिण्यास सक्षम करेल. एवढेच नाही तर यात इमेज जनरेशन, स्मार्ट रिप्लाय, न्यू सिरी आणि प्रायोरिटी नोटिफिकेशनचा पर्याय असेल.
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: iPhone 16 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3 इंचाचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. तर, मोठ्या iPhone 16 Pro Max मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.9 इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे.
- प्रोसेसर: दोन्ही प्रो मॉडेल्समध्ये नवीन A18 प्रो बायोनिक चिपसेट आहे. ॲपल iPhone 16 आणि 16 Plus मध्ये दिलेल्या A18 पेक्षा तो वेगवान आहे. यात दुसऱ्या पिढीचे 3nm डिझाईन वापरले आहे आणि त्यात 16-कोर न्यूरल इंजिन आहे जे A17 Pro पेक्षा वेगवान आणि कार्यक्षम आहे. त्याचवेळी, A17 Pro च्या तुलनेत हे 20 टक्के कमी पॉवर वापरेल याशिवाय, 6 कोर असलेल्या या नवीन चिपसेटची सीपीयू रचना 2x 3.89 GHz 4x 2.2 GHz आहे.
- कॅमेरा: iPhone 16 Pro सीरीज मध्ये एफ/1.78 अपर्चरसह 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी फ्यूजन कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा 5x टेलीफोटो कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा असलेला ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी तुम्हाला दोन्ही प्रो मॉडेल्सवर 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. डिव्हाईस 120p वर 4K शूट करू शकतो, ज्यामुळे उच्च-रिझोल्यूशन असलेले स्लो-मोशन फुटेज कॅप्चर करणे शक्य होते. तुम्हाला प्रो सीरिजवर नवीन कॅमेरा कंट्रोल देखील मिळेल.
- बॅटरी लाईफ: कंपनीच्या मते आयफोन 16 प्रो सीरीजमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम बॅटरी लाईफ असल्याचे वचन देण्यात आले आहे. दोन्ही फोनला ॲपल ने यूएसबी टाईप-सी पोर्टने सुसज्ज करून बाजारात लाँच केले गेले आहे. दोन्ही ही मॅगसेफ आणि क्यूआय वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. डिव्हाईसला 30W किंवा अधिक ॲडॉप्टरसह 25W पर्यंत मॅगसेफ वायरलेस चार्जिंग मिळेल. याशिवाय, त्यांना 33 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ मिळेल. तुम्हाला सांगतो की कंपनी आयफोन्स च्या बॅटरीबद्दल माहिती देत नाही.
- सॉफ्टवेअर: प्रो सीरीज फोन ॲपल इंटेलिजन्स आधारित आयओएस 18 वर काम करतात. iOS 18 च्या महत्त्वाच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये होमस्क्रीन पर्सनलायझेशन, सुधारित कंट्रोल सेंटर, ॲडिशन्स टू मेसेजेस ॲप, कॉल रेकॉर्डिंग, पासवर्ड ॲप आणि गेम मोड आहे. त्याचवेळी, कंपनीच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या अखेरीस ॲपल इंटेलिजन्सचे विनामूल्य अपग्रेड उपलब्ध होईल.
- इतर वैशिष्ट्ये: IP68 रेटिंग, यूएसबी टाईप-सी पोर्ट, मॅगसेफ चार्जिंग आणि NFC सपोर्ट आहे.