POCO X3 होत आहे 7 सप्टेंबरला लॉन्च, हा असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट वर चालणारा फोन

काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि टेक ब्रँड POCO स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला नवीन डिवाईस आणण्याची तयारी करत आहे जो POCO X3 नावाने लॉन्च केला जाईल. आता पोकोने अधिकृतपणे फोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. पोकोने ट्वीट करून घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 7 सप्टेंबरला आपला नवीन स्मार्टफोन POCO X3 टेक मंचावर सादर करेल. हा फोन पण ऑनलाईन लाईव स्ट्रीमच्या माध्यमातून लॉन्च केला जाईल.

POCO X3 ची लॉन्च डेट 7 सप्टेंबर घोषित झाली आहे. यादिवशी कंपनी 20:00 GMT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी लॉन्च ईवेंटचे अयोजन सुरु होईल. पोको एक्स3 चा लॉन्च कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रक्षेपित केला जाईल. नावावरून समजले असलेच कि पोको एक्स3 यावर्षी फेब्रुवारी मध्ये भारतात लॉन्च झालेल्या POCO X2 स्मार्टफोनचा पुढील वर्जन असेल जो लेटेस्ट चिपसेट सह लॉन्च होईल.

पोको एक्स3 बाबत बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉम द्वारे अलीकडेच अनाउंस केल्या गेलेल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 732जी वर लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर POCO X3 मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच पोको एक्स3 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात येऊ शकतो.

POCO X2

POCO X2 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. पोको ने आपला हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन वर सादर केला आहे जी शानदार विजुअल एक्सपीरियंस देते. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. POCO X2 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे.

POCO X2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला आहे, सोबतच हा डिवाईस डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 4 रियर कॅमेरा तसेच 2 सेल्फी कॅमेरे आहेत. सर्वात आधी फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर हा डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल मध्ये आहे. POCO X2 चा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे तसेच सेकेंडरी सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पोको एक्स2 चा रियर कॅमेरा सेटअप पाहता इथे फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX686 सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

पोको एक्स2 एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो मीयूआई 11 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO X2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 27वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here