आजकाल स्मार्टफोन मध्ये आग लागल्याच्या बातम्या येत असतात. पण जेव्हा ऍप्पल सारख्या कंपनीच्या स्मार्टफोन मध्ये पण आग लागू लागते तेव्हा तो एक चिंतेचा विषय बनतो. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्ये अमेरिकेच्या वॉशिंगटन मधून ऍप्पल आईफोन 10 मध्ये आग लागल्याची बातमी समोर आली होती. तर आता आईफोन एक्सएस मॅक्स मध्ये आग लागल्याची बातमी आली आहे. हि घटना अमेरिकेतील ओहियो ची आहे, जिथे एका व्यक्तीने खिशात आईफोन एक्सएस मॅक्स ठ्वला होता तेव्हा अचानक फोन मध्ये आग लागली.
आईड्रॉप नावाच्या वेबसाइट नुसार जे. हिलार्ड नावाची व्यक्ती 12 डिसेंबरला लंच ब्रेक वर होती तेव्हा त्याने पहिले कि त्याच्या खिशातून धूर निघत आहे आणि खिसा गरम झाला आहे. थोड्याच वेळात फोन फार्म झाला आणि पीडिती व्यक्तीने फोन बाहेर काढला तेव्हा त्यात आग लागली होती. या दुर्घटनेत पीडित व्यक्तीला इजा झाली आहे. कंपनी ने या घटनेची माहिती मिळतच जॉश हेराल्डला एक नवीन आईफोन एक्सएस मॅक्स दिला आहे. पण आपल्या मानसिक तणाव आणि शाररिक हानीसाठी त्याने कोर्टकडे धाव घेतली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शाओमीच्या फोन मध्ये पण आग लागल्याची बातमी समोर आली होती. तसेच अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या ट्वीटर हान्डेल वरून आईफोन 10 मध्ये लागलेल्या आगीची माहिती सार्वजनिक केली होती. राहेल मोहम्मद नावाच्या आईफोन यूजर ने आग लागल्यामुळे ऍप्पलला कोर्टात खेचले होते .
काही दिवसांपूर्वी ठाण्यात मोबाईल मध्ये आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील लोक जखमी झाले होते. रिपोर्ट समोर आला होता कि सकाळी फोन मध्ये ब्लास्ट झाला होता जेव्हा सर्व परिवार झोपेत होता. मोबाईल मध्ये झालेला ब्लास्ट इतका जोरदार होता कि संपूर्ण घरात आग लागली होती.















