Apple ने आपल्या वर्चुअल इवेंट मध्ये iPhone 12 5G सीरीज सादर केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा आयोजित करण्यात आलेल्या या इवेंट मध्ये iPhone 12 mini 5G, iPhone 12 5G, iPhone 12 Pro 5G आणि iPhone 12 Pro Max 5G सादर करण्यात आले आहेत. iPhone 12 Mini 5G या नवीन सीरीजचा असा फोन होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. हा हँडसेट ऍप्पलचा सर्वात छोटा आणि स्वस्त 5G मॉडेल आहे. इतकेच नव्हे तर फोन 5Gसपोर्ट सह येतो आणि यह Apple च्या ए14 बायोनिक चिप वर चालतो. या पोस्ट मध्ये मी तुम्हाला ऍप्पलच्या आयफोन 12 मिनी बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. या फोन बद्दल कंपनीने दावा केला आहे कि हा जगातील सर्वात छोटा, सर्वात हल्का आणि सर्वात बारीक 5G स्मार्टफोन आहे.
डिजाइन
डिजाइन पाहता iPhone 12 mini 5G गेल्यावर्षी सादर केल्या गेलेल्या आयफोन 11 पेक्षा वेगळ्या आणि नवीन डिजाइन मध्ये सादर केला गेला आहे. आयफोन 12 मिनी मध्ये छोटे, शार्प आणि फ्लॅट ऐज मिळतील. सोबतच यात चांगल्या क्वालिटीची बॉडी आहे. ‘मिनी’ मध्ये एक मजबूत फ्रंट ग्लास, नवीन कलर आणि बारीक बेजल्स सह एक ओएलईडी डिस्प्ले मिळतो. तर फ्रंटला असलेल्या नॉच मध्ये बॉयोमीट्रिक्ससाठी फेस आईडी मिळते. iPhone 12 मिनी च्या मागे चौकोनी डुअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश लाइट मिळते. साइजच्या बाबतीती हा फोन iPhone SE पेक्षा पण छोटा आहे.
डिस्प्ले
Apple iPhone 12 Mini 5G मध्ये 5.4-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन ओएलईडी सुपर रेटिना डिस्प्ले सह येतो. इतकेच नव्हे तर स्क्रीन 2,532 x 1,170p रिजोल्यूशन, 460ppi पिक्सल डेंसिटी, HDR 10 आणि HLG HDRसपोर्ट सह येते. स्क्रीन मजबूत बनवण्यासाठी सिरॅमिक शील्डचा वापर केला गेला आहे. यामुळे हा आयफोन आधीपेक्षा जास्त ड्यूरेबल झाला आहे.
दमदार कॅमेरा
आयफोन 12 मिनी मध्ये 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहेत, ज्यात क्रमशः एफ/1.6 अपर्चर आणि एफ/2.4 अपर्चर सह एक वाइड-अँगल आणि अल्ट्रा वाइड-अँगल शूटर आहे. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात सेल्फी आणि वीडियो चॅटसाठी 12MP अपर्चर f / 2.2 ट्रू डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा नवीन स्मार्ट मोड (फ्रंट कॅमेऱ्यासह), स्मार्ट एचडीआर 3 आणि नाइट मोड टाइम-लॅप्स सह येतो. कंपनीने सर्व नवीन आयफोन प्रमाणेच या फोन मध्ये नाइट मोड पण चांगले लो-लाइट रिजल्ट देण्यासाठी अपडेट केला आहे.
प्रोसेसर
फोन मध्ये अपग्रेडेड A14 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे जो ए13 चिपसेटच्या तुलनेत खूप वेगाने काम करेल. हा प्रोसेसर आधी लेटेस्ट iPad Air वर उपलब्ध आहे आणि हा चौथ्या पिढीच्या न्यूरल इंजन सह येतो. या नवीन चिप मध्ये 11.8 बिलियन ट्रांजिस्टर आणि 40% तेज सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (सीपीयू) आहे. यात 30% फास्ट ग्राफिक्स पण आहेत आणि हा 5-नॅनोमीटर मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेसह बनवण्यात आला आहे.
बॅटरी पावर आणि फास्ट चार्जिंग
ऍप्पल कधीच आपल्या आयफोन मधील बॅटरीचा खुलासा करत नाही. पण कंपनीने हि माहिती बॅटरी लाइफ म्हणून दिली आहे. कंपनीचा दावा आहे कि iPhone 12 mini मध्ये 15 तास वीडियो प्लेबॅक मिळेल. फोन मॅगसेफ वायरलेस चार्जिंग (15W पर्यंत) आणि ची वायरलेस चार्जिंगला (7.5W पर्यंत ) सपोर्ट करतो.
किंमत आणि विक्रीची माहिती
iPhone 12 mini तीन स्टोरेज वेरिएंट- 64GB, 128GB, आणि 256GB मध्ये सादर केला गेला आहे. iPhone 12 mini च्या 64GB वेरिएंटची किंमत 69,900 रुपये, 128GB वेरिएंटची किंमत 74,900 रुपये आणि 256GB वेरिएंटची किंमत 84,900 रुपये आहे. फोन blue, green, black, white आणि PRODUCT(RED) मध्ये येतो. फोन भारतात 30 ऑक्टोबर पासून मिळेल.

















