Home बातम्या Aashram 4: यावेळी होणार बाबा निरालाचा पर्दाफाश! अशी असेल आश्रम 4 ची गोष्ट

Aashram 4: यावेळी होणार बाबा निरालाचा पर्दाफाश! अशी असेल आश्रम 4 ची गोष्ट

Aashram Season 4: MX प्लेयरवरील लोकप्रिय वेब सीरीज आश्रमच्या तिसऱ्या सीजन नंतर लागेचच Aashram 4 Teaser जारी करण्यात आला होता, त्यामुळे दर्शकांमध्ये या नवीन सीजनबद्दल खूप उत्सुकता दिसून आली आहे. परंतु अजूनही Aashram 4 ची Release Date समोर आलेली नाही. पुढील वर्षी नवीन सिझन ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर रिलीज केला जाईल, अशी चर्चा आहे. तसेच चौथ्या सिझनच्या टीजर रिलीजमधून गोष्टीची चाहूल लागली आहे.

पाहा Ashram 4 चा टीजर

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलच्या कारकिर्दीला जोरदार बूस्ट देणारी आश्रम वेबसीरिज खूप खास आहे. बॉबीने गेल्या तीन सीझनमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या नवीन सीजनमध्ये पम्मी नवरीच्या अवतारात दिसत आहे. तर बाबा निरालाचा पर्दाफाश होऊ शकतो आणि त्याला कदाचित अटक देखील होण्याची शक्यता आहे. टीजरच्या सुरुवातीलाच बाबा निराला म्हणतो की, ‘भगवान हम हैं, तुम्हारे कानों से ऊपर स्वर्ग बनाया है मैंने. भगवान को कैसे अरेस्ट कर सकते हो?’ तसेच, टीजरमध्ये त्रिधा चौधरीची देखील झलक दिसत आहे. हे देखील वाचा: OTT वर 90 चं दशक गाजवलेल्या हिरोइन्सची जादू; पाहा कोणी केलाय नव्या फॉरमॅटचा चांगला स्वीकार

आश्रम सीझन 4 चा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. एक मिनिटाच्या या टीझरमध्ये बॉबी देओल स्वत:ला देव म्हणवताना दिसत आहे. तसेच बाबा निराला आश्रममध्ये येताच भक्त ‘बाबा निराला की जय’ म्हणत आहेत. प्रत्येक सीझनप्रमाणे पोलिसही बाबाच्या मागे लागले आहेत. परंतु आश्रम 4 मध्ये बाबा निराला पोलिसांच्या हाती लागतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Aashram सीजन 4 ची रिलीज डेट

Bobby Deol च्या वेब सीरिज Aashram ला दर्शकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे आणि ते पाहून सीरिजच्या चौथ्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे. MX Player द्वारे जारी करण्यात आलेल्या टीजरनुसार एक बदनाम Ashram 4 पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये रिलीज केला जाईल. परंतु अजूनही स्ट्रीमिंग डेटबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु हा सीझन जून 2023 मध्ये दर्शकांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. हे देखील वाचा: R. Madhavan चा सुपरहिट चित्रपट Rocketry होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या तारीख आणि वेळ

Aashram 4 मध्ये असतील ही पात्र

बॉबी देओलच्या Ashram 3 प्रमाणेच Ashram 4 चे सर्व एपिसोड्स एकत्र एकाच दिवशी रिलीज होतील. तसेच आश्रमच्या चौथ्या सीजनमध्ये बॉबी देओल आणि ईशा गुप्ता व्यतिरिक्त अदिती पोहनकर, दर्शन कुमार, त्रिधा चौधरी, चंदन रॉय सान्याल आणि अनुरिता झा महत्वाच्या भूमिकेत दिसतील. ‘आश्रम’ चे आतापर्यंतचे सर्व सीजन प्रकाश झानी दिग्दर्शित आणि प्रोड्यूस केली आहेत. वेब सीरीज ‘एक बदनाम आश्रम’ व्यतिरिक्त प्रकाश झा यांनी ‘सत्याग्रह’ आणि ‘जय गंगाजल’ सारखे चित्रपट बनवले आहेत.