R. Madhavan चा सुपरहिट चित्रपट Rocketry होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या तारीख आणि वेळ

आर माधवन (R. Madhavan) ची फिल्म Rocketry: The Nambi Effect बॉक्स ऑफिस चांगलं प्रदर्शन केल्यानंतर आता OTT वर येण्यास तयार आहे. विशेष म्हणजे 2 जुलैला थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट (Rocketry Movie 2022) आता रिलीजनंतर 24 दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे. Amazon Prime Video नं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेयर करून याची माहिती दिली आहे. ही फिल्म जवळपास 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली होती, तसेच या फिल्मनं बॉक्स ऑफिसवर एकूण 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

या OTT वर रिलीज होईल चित्रपट

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून अशी माहिती दिली आहे की, 26 जुलै म्हणजे पुढील आठवड्यात त्यांच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट येणार आहे. परंतु यादिवशी चित्रपटाचं हिंदी व्हर्जन प्लॅटफॉर्मवर येणार नाही. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओनं शेयर केलेल्या पोस्टरवर हिंदीचा उल्लेख नाही. तसेच याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देखील समोर आलेली नाही की हा चित्रपट हिंदी भाषेत कधी स्ट्रीम केला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचं हिंदी व्हर्जन दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतं. यात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix चं नाव अग्रस्थानी आहे. हे देखील वाचा: फक्त 306 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला फोन; अशी आहे REDMI 9i Sport वरील ऑफर

R Madhavan नं केलंय चित्रपटाचं दिग्दर्शन

सबकुछ माधवन असं वर्णन Rocketry या चित्रपटाचं करता येईल. R Madhavan फक्त मुख्य भूमिकेत नाही तर या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात माधवन उतरला आहे. हा चित्रपट भारतातील प्रसिद्ध एरोस्पेस इंजिनियर Nambi Narayanan यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यात त्यांनी भारतीय स्पेस प्रोग्रॅममध्ये दिलेलं योगदान दाखवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यावर झालेल्या देशद्रोहाच्या आरोपानंतर त्यांना कशाप्रकारे स्ट्रगल करावा लागला हे दाखवण्यात आलं आहे. नंबी नारायण यांचा लूक माधवननं हुबेहूब दाखवला आहे तसेच त्याच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक देखील प्रेक्षकांनी केलं आहे.

OTT ची रिलीज डेट समोर येण्याआधी Ranganathan Madhavan म्हणजे आर माधवननं ट्विटरवर केट करून Rocketry चित्रपटाचं यश शेयर केलं आहे. माधवननं आपला आनंद व्यक्त करत सांगितलं की त्याला खूप आनंद आहे की संपूर्ण कुटुंबासह त्याला हे यश साजरं करता येत आहे. हे देखील वाचा: OTT वरील सर्वात भीतीदायक चित्रपट; हॉलीवुडच्या हॉरर चित्रपटांनाही टाकतील मागे

Amazon Prime plan prices in India

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये Amazon Prime India plan prices रिवाइज करण्यात आल्या होत्या. या वाढीनंतर 129 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 179 रुपये झाली आहे. प्राईस हाईकच्या आधी अ‍ॅमेझॉन प्राईम सदस्यत्वाच्या मंथली प्लॅनची किंमत 129 रुपये, क्वॉटरली प्लॅनची किंमत 329 रुपये आणि वार्षिक प्लॅनची किंमत 999 रुपये होती. आता हेच प्लॅन्स अनुक्रमे 179, 459, 1499 रुपये असे झाले आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here