OTT वर 90 चं दशक गाजवलेल्या हिरोइन्सची जादू; पाहा कोणी केलाय नव्या फॉरमॅटचा चांगला स्वीकार

सध्या ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) वर मोठ्याप्रमाणावर कंटेंट उपलब्ध आहे त्यामुळे करमणूक कमी होत नाही. तसेच, ओटीटीनं अशा अभिनेत्याचं जीवन रातोरात बदललं आहे ज्यांना आधी कोणीच ओळखत नव्हतं. तसेच या नव्या युगाच्या प्लॅटफॉर्मनं बॉलीवुडच्या जुन्या कलाकारांना आणखी एक इनिंग खेळण्याची संधी दिली आहे. या यादीत 90 चं दशक गाजवलेल्या अनेक बॉलीवुड हिरोइन्सचा देखील समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अ‍ॅक्टर्सची माहिती देणार आहोत ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली दुसरी इनिंग फक्त सुरु केली नाही तर त्यांची चांगली फटकेबाजी देखील सुरु आहे.

या 90 च्या दशकातील बॉलिवूड हिरोइन्सनं OTT वरही केली आहे हवा

  • Sushmita Sen
  • Raveena Tandon
  • Madhuri Dixit
  • Sonali Bendre
  • Juhi Chawla
  • Shilpa Shetty
  • Karisma Kapoor

1. Sushmita Sen: ललित मोदींसोबत आपल्या नात्याची घोषणा केल्यानंतर चर्चेत आलेली Sushmita Sen सध्या ओटीटीचा प्रमुख चेहरा बनली आहे. बॉलिवुडमध्ये एकेकाळी लोकप्रिय असलेल्या सुष्मिताची हॉटस्टारवर 2020 मध्ये रिलीज झालेली ‘आर्या’ खूप लोकप्रिय वेब सीरीज आहे. आर्या क्राइम-थ्रिलर ड्रामा सीरीज आहे, जिचे दोन सीजन आले आहेत आणि आता तिसरा सीजन देखील लवकरच स्ट्रीम केला जाईल, अशी बातमी आहे.

2. Raveena Tandon: रवीना टंडननं देखील अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आलेल्या आरण्यक (Aranyak) मधून OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. 10 डिसेंबर 2021 रोजी रिलीज झालेल्या आरण्यकमध्ये रवीनाने पोलीस ऑफिसरची भूमिका बजावली होती. या सीरीजमध्ये रवीना सिरोना नावाच्या एका काल्पनिक पोलीस ठाण्याची मुख्य अधिकारी दाखवण्यात आली आहे, जिचं नाव कस्तूरी डोगरा आहे.

3. Madhuri Dixit: द फेम गेम नावाच्या थ्रिलर वेब सीरीजमधून Madhuri नं ओटीटी डेब्यू केला होता. ही सीरीज यावर्षी 25 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आली होती. माधुरी व्यतिरिक्त या सीरीजमध्ये संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन आणि मुस्कान जाफरी प्रमुख भूमिकेत आहेत. या सीरीजची कहानी पाहता माधुरीनं अनामिका नावाच्या एका फिल्म सुपरस्टारची भूमिका बजावली होती.

4. Sonali Bendre: 90 च्या दशकातील पॉपुलर अभिनेत्री सोनालीनं अलीकडेच The Broken News मधून आपला ओटीटी डेब्यू केला. या वेब सीरीजमध्ये Paatal Lok फेम Jaideep Ahlawat देखील आहे. तसेच, सीरीजमध्ये टॅलेंटेड मराठी अभिनेत्री Mirzapur फेम Shriya Pilgaonkar देखील आपल्या अ‍ॅक्टिंगचा जलवा दाखवत आहे. ही सीरीज ZEE5 वर स्ट्रीम केली जाऊ शकते.

5. Juhi Chawla: जूही चावला ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सीरीज ‘हश हश’ मधून ओटीटी डेब्यू करणार आहे. या सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा झाली नाही, परंतु लवकरच ही सीरीज दर्शकांच्या भेटीला येईल. जूहीनं एकेकाळी 90 चं दशक गाजवलं होतं आणि अजूनही ती बॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये दिसते.

6. Shilpa Shetty: अभिनेत्री Shilpa ला बॉलीवुडचा प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी लवकरच ‘इंडियन पोलीस फोर्स’ च्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन प्राईमवर घेऊन येणार आहे. या सीरीज सोबतच Shilpa Shetty देखील आपल्या ओटीटी डेब्यूसाठी तयार आहे. परंतु अजूनतरी या सीरीजची रिलीज डेट समोर आली नाही.

7. Karisma Kapoor: करिश्मा कपूर 90 च्या दशकातील पहिली अशी अभिनेत्री आहे जिने दोन वर्षांपूर्वी अल्टबालाजी आणि जी5 च्या शो ‘मेंटलहुड’ मध्ये प्रमुख भूमिका केली होती. आता आशा आहे की लवकरच ती अजून एका प्रोजेक्टसह ओटीटीवर पुनरागमन करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here