Amazon Great Indian Festival Sale: बड्या टेलिकॉम कंपन्यांनी पुढील काही महिन्यांत भारतात 5G सर्व्हिस लाँच करण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे तुम्ही कदाचित तुमच्यासाठी नवीन 5G फोन विकत घेऊ इच्छित असाल. सुदैवाने सध्या सुरु असलेल्या Amazon Great Indian Festival Sale मध्ये अनेक 5G स्मार्टफोन्स जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर अॅमेझॉननं SBI सोबत अतिरिक्त 10 टक्के डिस्काउंटसाठी भागेदारी केली आहे, त्यामुळे SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांना या ऑफरचा फायदा घेता येईल. पुढे आम्ही अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणाऱ्या 5G स्मार्टफोन्स डिल्सची यादी दिली आहे.
Apple iPhone 12
iPhone 12 स्मार्टफोन अॅमेझॉन सेल दरम्यान आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजे 43,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, इतर वेळी या आयफोनसाठी 55,900 रुपये मोजावे लागतील. iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन A14 Bionic चिपसेटसह येतो. फोनमध्ये 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा 4K Dolby Vision HDR आणि नाइट मोड, डीप फ्यूजन आणि Smart HDR 3 वर चालतो. ड्यूरेबिलिटी पाहता, iPhone 12 मध्ये क्रेमिक शील्ड बिल्ड आणि IP68 वॉटर रजिस्टेंट रेटिंग देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हा 5G ला सपोर्ट करतो.
प्राइस: 55,900 रुपये
डील प्राइस: 43,499 रुपये
OnePlus Nord CE 2 Lite 5G
OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन सध्या 16,749 रुपयांमध्ये विकला जात आहे, ही किंमत बँक डिस्काउंट आणि 500 रुपयांच्या कुपन डिस्काउंटनंतर 19,999 रुपयांवरून इतकी खाली आली आहे. हा चांगली परफॉर्मन्स देतो आणि क्वॉलकॉमच्या लेटेस्ट 5G प्रोसेसर सह आला आहे. Oneplus Nord CE2 Lite 5G कंपनीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 6.59 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.
प्राइस: Rs 19,999
डील प्राइस: Rs 16,749 रुपये
Redmi Note 11 Pro + 5G
Redmi Note 11 Pro+ 5G सध्या मिडरेंजमध्ये उपलब्ध असलेला बेस्ट डिवाइस आहे. 20,999 रुपयांच्या ऐवजी हा स्मार्टफोन या सेलमध्ये 16,499 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्यात 1,250 रुपयांच्या कुपन डिस्काउंट आणि बँक डिस्काउंटचा समावेश आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात 6GB रॅम देण्यात आला आहे. कंपनीनं हा फोन 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्लेसह सादर केला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 108MP च्या मेन सेन्सरसह 8MP चा वाइड अँगल आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. तर फ्रंटला 16MP कॅमेरा मिळतो. या बजेटमध्ये 108MP कॅमेरा खूप खास म्हणता येईल. राहिला प्रश्न बॅटरीचा तर कंपनीनं हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.
प्राइस: 20,999 रुपये
डील प्राइस: 16,499 रुपये
Samsung Galaxy S20 FE 5G
Samsung Galaxy S20 FE 5G अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये बँक डिस्काउंटनंतर 28,350 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 34,949 रुपये आहे. स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. प्रोसेसिंगसाठी सॅमसंग एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर 12 मेगापिक्सलचे मेन कॅमेरा, 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असलेला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
प्राइस: 34,949 रुपये
डील प्राइस: 28,350 रुपये
OnePlus Nord 2T 5G
OnePlus Nord 2T 5G बाजारात उपलब्ध असलेल्या लोकप्रिय स्मार्टफोन्स पैकी एक आहे. या सेलमध्ये याची किंमत बँक डिस्काउंटमुळे 27,499 रुपयांवर आली आहे, परंतु याची मूळ किंमत 28,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Corning Gorilla Glass 5 च्या सुरक्षेसह येतो. फोनमध्ये MediaTek चा Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX615 कॅमेरा मिळतो.
प्राइस: 28,999
डील प्राइस: 27,499 रुपये
Redmi K50i 5G
जर तुम्हाला फ्लॅगशिप ग्रेड स्पेसिफिकेशन्स बजेटमध्ये हवे असतील Redmi K50i 5G बाजारात उपलब्ध असलेल्या बेस्ट स्मार्टफोन्स पैकी एक आहे. साधरणतः हा स्मार्टफोन 25,999 रुपयांमध्ये विकला जातो परंतु ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये याची किंमत 20,749 रुपयांवर आली आहे, ज्यात 1,000 रुपयांच्या कुपन आणि बँक डिस्काउंटचा समावेश आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर वर चालतो जो गेमिंगसाठी दमदार ऑप्शन आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz, DC dimming आणि Dolby Vision ला सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 5080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग मिळते. फोनमध्ये वेगवान UFS 3.1 स्टोरेज आणि 6GB LPDDR5 RAM देण्यात आला आहे आणि लिक्विड कुलिंग टेक्नॉलॉजीमुळे यात गेमिंग स्मूद होते.
प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 20,749 रुपये
Samsung Galaxy M33 5G
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन या सेलमध्ये बँक डिस्काउंटनंतर 13,449 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो नेहमी 18,999 रुपयांमध्ये विकला जातो. हा फोन Exynos 1280 ऑक्टा कोर प्रोसेसरसह बाजारात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 च्या सुरक्षेसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा क्वॉड कॅमेरा रिअर सेटअप आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. यातील 6,000mAh ची मोठी बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 12 आधारित OneUI 4 वर चालतो.
प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 13,499 रुपये
OnePlus Nord CE 2 5G
OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन 500 रुपयांच्या कुपन आणि बँक डिस्काउंटनंतर 21,748 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 23,999 रुपये आहे. OnePlus Nord CE 2 5G हा सर्वात हलक्या आणि स्लिम स्मार्टफोन्स पैकी एक आहे. फोनमध्ये HDR10+ ला सपोर्ट कारणानं 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात Mediatek Dimensity 900 चिपसेटचा वापर केला आहे. फोनच्या मागे 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा एक सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 3.5mm हेडफोन जॅकसह डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो. यातील 4,500mAh ची बॅटरी 65W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये लेटेस्ट 5G सह Wi-Fi 6 ची सोय करण्यात आली आहे.
प्राइस: 23,999 रुपये
डील प्राइस: 21,748 रुपये
Samsung Galaxy M53 5G
Samsung Galaxy M53 5G सध्या बँक डिस्काउंटमुळे 19,749 रुपयांमध्ये विकला जात आहे, ही किंमत सेलपूर्वी 26,499 रुपये होती. Samsung Galaxy M53 5G मिडरेंजमधील एक चांगला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Mediatek Dimensity 900 प्रोसेसरची पावर मिळते. फोनच्या मागे 108MP क्वॉड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी शुटर मिळतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे.
प्राइस: 26,499 रुपये
डील प्राइस: 19,749 रुपये
iQOO Z6 5G
iQOO Z6 5G आमच्या बेस्ट 5G स्मार्टफोन्सच्या डील मधील शेवटचा हँडसेट आहे. जो सध्या 15,499 रुपयांच्या ऐवजी 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन 2408×1080 पिक्सल आहे. आयकूच्या या फोनला Panda Glass प्रोटेक्शन लेयर देण्यात आली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि Adreno 619 GPU सह येतो. जो Android 12 आधारित Funtouch 12 ओएसवर चालतो. यात 5,000mAh ची बॅटरी मिळते. तसेच कॅमेरा पाहता iQOO Z6 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
प्राइस: 15,499 रुपये
डील प्राइस: 14,999 रुपये














