BSNL चे 2022 मधील बेस्ट रिचार्ज प्लॅन्स ज्यांच्यामोर Jio-Airtel देखील आहेत फेल

सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) देशातील प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्स पैकी एक आहे. जरी Jio, Airtel आणि Vi सारख्या बड्या कंपन्यांकडून स्पर्धेचा सामना करावा असला तरी अजूनही ही कंपनी तग धरून आहे. बीएसएनएल सध्या देशातील टियर II आणि टियर III सर्कल्सच्या युजर्समध्ये लोकप्रिय आहे. जर तुम्ही Best BSNL Recharge Plan चा शोध घेत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक यादी घेऊन आलो आहोत. पुढे आम्ही तुम्हाला सरकारी कंपनीच्या वेगवेगळ्या व्हाउचर आणि ऑफरची माहिती दिली आहे जे 2022 मध्ये मिळत आहेत.

Best BSNL prepaid recharge plans 2022

बीएसएनएल भारतात अपने ग्राहकांना अनेक प्रकारचे प्रीपेड पॅक देते. पुढे आम्ही तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉल असलेल्या चांगल्या प्रीपेड पॅकची माहिती दिली आहे, जे देशातील बहुतांश भागात लागू आहेत. चला जाणून घेऊया सर्वकाही.

BSNL 30 Days Prepaid Recharge Plan Starting price rs 75

Rs 97 BSNL recharge plan

Rs 99 BSNL recharge plan

Rs 118 BSNL recharge plan

Rs 184 BSNL recharge plan

Rs 185 BSNL recharge plan

Rs 186 BSNL recharge plan

Rs 247 BSNL recharge plan

Rs 319 BSNL recharge plan

Rs 347 BSNL recharge plan

Rs 429 BSNL recharge plan

Rs 485 BSNL recharge plan

Rs 666 BSNL recharge plan

Rs 699 BSNL recharge plan

Rs 999 BSNL recharge plan

Rs 1499 BSNL recharge plan

BSNL One Year prepaid plan

Rs 97 BSNL recharge plan

बीएसएनएल युजर्ससाठी सर्वात किफायतशीर प्रीपेड पॅक आहे. टॅरिफची वैधता 18 दिवस आहे. फायदे पाहता या रिचार्जमध्ये तुम्हाला देशातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल, रोज 2GB डेटा आणि लोकधुन कंटेंट मिळतो. तसेच पॅकसह एसएमएस बेनिफिटचा देखील समावेश आहे.

Rs 99 BSNL recharge plan

99 रुपयांच्या बीएसएनएल रिचार्ज प्लॅनची वैधता 97 रुपयांच्या एसटीव्हीच्या तुलनेत थोडी जास्त आहे, परनु यात डेटा बेनिफिट्स नाहीत. तुम्हाला फक्त मोफत व्हॉइस कॉल आणि पीआरबीटी सेवा या प्लॅनमध्ये मिळते. तसेच या प्लॅनमध्ये 22 दिवस वैधता मिळते, सोबत फ्री कॉलर ट्यून देखील मिळेल.

Rs 118 BSNL recharge plan

BSNL च्या 118 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल, 0.5GB डेटा प्रति दिन, फ्री PRBT सर्व्हिस आणि 26 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये SMS चे फायदे मिळत नाहीत.

Rs 184 BSNL recharge plan

184 रुपयांचा रिचार्ज प्लॅन डेटा, फ्री व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येतो. तुम्हाला यात 28 दिवसांच्या वैधतेसह 1GB डेली डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड मोफत व्हॉइस कॉलिंग मिळते. बीएसएनएलचा हा प्रीपेड पॅक लिसन पॉडकास्टचं मोफत सब्सस्क्रिप्शन देतो.

Rs 185 BSNL recharge plan

185 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे जवळपास 184 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन सारखे आहेत. परंतु यात प्रति दिन 1GB डेटा, 100 एसएमएस आणि अमर्याद व्हॉइस कॉल सोबतच यात मेसर्स ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेड आणि बीएसएनएल ट्यून्सकडून प्रोग्रेसिव्ह वेब एपीपी (पीडब्ल्यूए) वर चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिसचं सब्सक्रिप्शन फ्री मिळतं.

Rs 186 BSNL recharge plan

186 रुपयांच्या बीएसएनएल रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 28GB डेटा (प्रति दिन 1GB), मोफत व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस पण मिळतात. हार्डी गेम्स आणि बीएसएनएल ट्यून्सच्या बाबतीत देखील यात अतिरिक्त लाभ मिळतात.

Rs 187 BSNL recharge plan

हा एक ऑल-इन-वन प्रीपेड पॅक आहे, ज्यात रोज नि:शुल्क 100 आउटगोइंग टेक्स्ट मेसेजचा लाभ मिळतो. तसेच 187 रुपयांच्या बीएसएनएल एसटीव्हीचे इतर बेनिफिट्स पाहता यात मोफत व्हॉइस कॉल, एकूण 50 जीबी डेटा, बीएसएनएल ट्यून्स, इरोज नाउ सब्सक्रिप्शन आणि 28 दिवसांची मिळते.

Rs 247 BSNL recharge plan

247 रुपयांचा यह प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 50GB हाय-स्पीड डेटा, 100 एसएमएस/ दिवस, बीएसएनएल ट्यून्स आणि इरोज नाउचे फायदे दत्त. या प्लॅनची वैधता 30 दिवस आहे.

Rs 319 BSNL recharge plan

319 रुपयांचा बीएसएनएल एसटीव्ही मोफत व्हॉइस कॉल, एकूण 10 जीबी डेटा, 300 एसएमएस आणि पीआरबीटी + लोकधुन सब्सक्रिप्शनसह येतो. तसेच या प्लॅनची वॅलिडिटी 75 दिवस आहे.

Rs 347 BSNL recharge plan

या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. यात 2GB डेली डेटा, 100SMS आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलचा समावेश आहे. तसेच सब्सक्रायबर्सना मेसर्स ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेड द्वारे प्रोग्रेसिव वेब एपीपी (पीडब्ल्यूए) वर मोफत चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिस मिळते.

Rs 429 BSNL recharge plan

429 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 81 दिवस आहे. यात दिल्ली आणि मुंबईच्या रोमिंगसह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रतिदिन 1GB डेटा, प्रतिदिन मोफत 100 एसएमएस आणि इरोज नाउचे फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

Rs 485 BSNL recharge plan

बीएसएनएलच्या 485 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री व्हॉइस कॉल, 1.5 GB डेटा प्रति दिन आणि 100 एसएमएस वापरता येतात. तसेच प्लॅनची वैधता 90 दिवस आहे.

Rs 666 BSNL recharge plan

आमच्या मते हा सर्वात चांगला ऑल-इन-वन प्रीपेड पॅक असेल. 666 रुपयांच्या बीएसएनएल रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 100 एसएमएस/दिवस आणि 120 दिवस वैधता मिळते.

Rs 699 recharge plan

699 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 180 दिवस आहे. तसेच रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस / दिवस मिळतील. परंतु हा प्लॅन रोज फक्त 0.5 जीबी डेटा देतो.

BSNL Rs 999 recharge plan

999 रुपयांच्या या बीएसएनएल प्लॅनकडे पाहता यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल करता येतील. तसेच यात 240 दिवसांची वैधता मिळते. परंतु रिचार्जमध्ये कोणतेही डेटा आणि एसएमएस बिनिफिट्स नाहीत.

BSNL BINDAS BOL prepaid plan

हा रिचार्ज प्लॅन खासकरून त्या लोकांसाठी आहे जे जास्त गप्पा मारतात. या प्लॅनची किंमत प्राईस 1,499 रुपये आहे आणि यात तुम्हाला प्रतिदिन 250 कॉलिंग मिनट, प्रतिदिन 100 एसएमएस मिळतात. तसेच डेटा पाहता या रिचार्जमध्ये 1 वर्षासाठी 365 दिवसांसाठी एकूण 24 जीबी डेटा मिळतो.

BSNL One Year prepaid plan

हा प्लॅन तुम्हाला एक वर्षाची म्हणजे 365 दिवसांची वॅलिडिटी देतो. प्लॅन बेनिफिट्स पाहता, यात ग्राहकांना 2GB डेटा डेली, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, रोज 100 एसएमएस आणि 60 दिवसांचे लोकधुन प्रतियोगिता आणि सोनी लिव्हचे सब्सस्क्रिप्शन मिळते.

Note: बीएसएनएलचे संपूर्ण देशात वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या बेनिफिट्ससह येतात. रिचार्ज करण्याआधी प्लॅनमधील बेनिफिट्स कंपनीच्या साईट किंवा बीएसएनएल कस्टमर केयरवरून कन्फर्म करून घ्या.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here