कमी किंमत असलेले बजेट स्मार्टफोन नेहमीच मोबाइल युजर्सना आवडतात. यावेळी Amazon Great Indian Festival सेलनं असे फोन्स आणखी स्वस्त केले आहेत. हे डिवाइस प्राइसच्या बाबतीत स्वस्त असतील, तसेच ह्यात मिळणारे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाहीत. हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, मजबूत बिल्ड क्वॉलिटी, चांगला कॅमेरा आणि मोठा बॅटरी बॅकअप सर्व इन budget smartphones मध्ये मिळतात. अॅमेझॉन सेलमध्ये उपलब्ध अशा बेस्ट बजेट स्मार्टफोन्सची माहिती पुढे शेयर करण्यात आली आहे.
Redmi 12C
रेडमी 12सी एक ऑलराउंडर बजेट डिवाइस आहे जो स्मूद परफॉर्मन्स देतो. हा स्ट्रीप स्टाइल डिजाइनसह आला आहे ज्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला 6.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मज-रजिस्टेंट ओलियोफोबिक कोटिंगमुळे वापर करताना ह्यावर बोटांचे ठसे येत नाहीत. ह्याला आयपी52 रेटिंग देखील मिळाली आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसरवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्यात 50 मेगापिक्सलचा एआय ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो हाय रिजोल्यूशन शॉट घेतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
सेलिंग प्राइस: 8,499 रुपये
डील प्राइस: 6,999 रुपये
Redmi A2
अॅमेझॉन सेलमध्ये हा बजेट स्मार्टफोन देखील डिस्काउंटसह उपलब्ध आहे. रेडमी ए2 मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. प्रोसेसिंगसाठी हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो. कॅमेरा सेग्मेंट पाहता ह्याच्या बॅक पॅनलवर एआय टेक्नॉलॉजीसह 8 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा लो बजेट स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी मोठा बॅकअप देते. हा रेडमी फोन पाण्याच्या शिंतोड्यांपासून सुरक्षित राहू शकतो.
सेलिंग प्राइस: 6,799 रुपये
डील प्राइस: 5,899 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Realme Narzo N53
रियलमी नारजो एन53 स्मार्टफोनमध्ये 90हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला 6.74 इंचाचा फुलएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन दमदार कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा एआय सेन्सर आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी नारजो एन53 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो तसेच वेगानं चार्ज करण्यासाठी 33वॉट सुपरवूक चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा मोबाइल यूनिसोक टी612 चिपसेटवर चालतो.
सेलिंग प्राइस: 8,999 रुपये
डील प्राइस: 7,999 रुपये
itel A60s
हा लो बजेट स्मार्टफोन 6.6 इंचाच्या एचडी आयपीएस स्क्रीनला सपोर्ट करतो. आयटेल ए60ए यूनिसोक स्प्रेडट्रम9862ए1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच करण्यात आला आहे जो स्मूद परफॉर्म करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा एआय रियर कॅमेरा सेन्सर तसेच 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. ह्यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर दोन्ही मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी itel A60s 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
सेलिंग प्राइस: 6,999 रुपये
डील प्राइस: 4,999 रुपये
Samsung Galaxy M04
सॅमसंग गॅलेक्सी एम04 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 269पीपीआयला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो पी35 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. हा फोन अँड्रॉइड 12 सह येतो ज्यावर 2 वर्षांच्या ओएस अपग्रेड मिळतो.
सेलिंग प्राइस: 8,499 रुपये
डील प्राइस: 6,499 रुपये
Samsung Galaxy M13
जर तुम्ही मोठा बॅटरी बॅकअप असलेला एखादा स्मार्टफोन शोधत असाल तर गॅलेक्सी ए13 तुम्हाला आवडेल. हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय सोबतच फोन एक्सनॉस 850 चिपसेटवर चालतो.
सेलिंग प्राइस: 10,999 रुपये
डील प्राइस: 8,999 रुपये
itel P55 5G
अफॉर्डेबल प्राइसमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी देण्यासाठी मोबाइलचे नाव टॉपला आहे. भारतात लाँच झालेला सर्वात स्वस्त आणि लेटेस्ट 5जी स्मार्टफोन आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 चिपसेट देण्यात आला आहे जो स्मूद प्रोसस करतो. हा मोबाइल फोन 90हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्लेला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा एआय ड्युअल रियर कॅमेरा तसेच 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. itel P55 5G फोन पावर बॅकअपसाठी 18वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
सेलिंग प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 8,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Realme Narzo 50i Prime
रियलमी नारजो 50आय प्राइममध्ये 5.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा लो बजेट मोबाइल फोन यूनिसोक टी612 चिपसेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सल रियर सेन्सर तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
सेलिंग प्राइस: 7,699 रुपये
डील प्राइस: 6,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Lava Blaze 5G
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये लावा ब्लेज 5जी फोन देखील दमदार सूटसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ही स्क्रीन वाइडवाइन एल1 डीआरएमसह येते ज्यावर हाय क्वॉलिटी ओटीटी व्हिडीओज पाहता येतात. हा मोबाइल मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरवर चालतो जो स्मूद परफॉर्मन्स देतो. फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये 2के व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारा 50 मेगापिक्सलचा एआय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे ह्या फोनमध्ये युट्युब बॅकग्राउंडमध्ये वापरता येतं आणि लोकांच्या नकळत कॉल रेकॉर्ड करता येते.
सेलिंग प्राइस: 10,999 रुपये
डील प्राइस: 8,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Vivo Y02t
विवो वाय02टी देखील आपल्या लो प्राइसच्या जीवावर ह्या लिस्टमध्ये आला आहे. हा मोबाइल 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आय प्रोटेक्शन फीचरसह आला आहे. हा मोबाइल अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएससह चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा तथा 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी ह्यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
सेलिंग प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 7,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)














