ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर अॅन्युअल फेस्टिवल सेल अर्थात अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल लाइव्ह झाला आहे. आज 22 सप्टेंबरला सध्या अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु झाली आहे. सामान्य ग्राहकांसाठी सेल 23 सप्टेंबरपासून खुली होईल. सेल दरम्यान अॅमेझॉनवरील प्रत्येक कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्ट टीव्हीवर देखील जोरदार डिस्काउंट दिला जात आहे. इथे आम्ही तुम्हाला अॅमेझॉन इंडियाच्या सेल दरम्यान स्मार्ट टीव्हीजवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची माहिती देत आहोत. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सीजन सेल दरम्यान मिळणाऱ्या बेस्ट टीव्ही डील्स पुढील प्रमाणे:
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल: बेस्ट स्मार्ट टीव्ही डील्स
Redmi 32Inch HD Ready Smart TV
Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. Redmi चा हा स्मार्ट टीव्ही Android 11 वर चालतो. तसेच टीव्ही HD Ready Smart LED TV आहे, ज्यात 32 इंचाचा वाइड डिस्प्ले देण्यात आला आहे. रेडमीच्या या टीव्हीची खासियत पाहता हा HD-रेडी डिस्प्लेसह येतो, जो विविड पिक्चर, ड्युअल बँड वायफाय सारख्या अॅडव्हान्स फीचर्ससह बाजारात आला आहे.
प्राइस – 24,999 रुपये
डील प्राइस – 8,099 रुपये
OnePlus 32 Inch Y Series Smart TV
वनप्लसचा हा स्मार्ट टीव्ही यूनीक टीव्ही स्टॅन्ड सह येतो. OnePlus Y सीरीजच्या टीव्हीमध्ये HD Ready LED डिस्प्ले देण्यात आला आहे जो मोठ्या रेंजच्या कलर्सला सपोर्ट करतो. वनप्लसच्या या टीव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात OnePlus कनेक्ट, क्रोमकास्ट, प्ले स्टोर, गुगल असिस्टंटचा देखील समावेश आहे. या टीव्हीमध्ये Netflix, प्राइम व्हिडीओ आणि युट्युब सारखे अनेक ओटीटी अॅप्स मिळतात.
प्राइस – 19,999 रुपये
डील प्राइस – 8,774 रुपये
OnePlus Y Series 4K Smart TV
OnePlus 43 इंच 4K UHD टीव्ही बेजल लेस डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये शानदार पिक्चर क्वॉलिटीसाठी HDR10+ HDR10, HLG आणि MEMC सह Gamma Engine सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय आहे. दमदार आवाजासाठी 24W चे स्पिकर्स देखील आहेत. वनप्लसचा हा टीव्ही वनप्लस कनेक्ट इकोसिस्टमला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सारखे अॅप्स वापरता येतात.
प्राइस – 39,990 रुपये
डील प्राइस – 22,499 रुपये
Samsung 43 Inch Crystle 4K Neo Series TV
सॅमसंगच्या 43″ स्मार्ट टीव्हीमध्ये 4K प्रो UHD (3840 x 2160 पिक्सल) डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीचे टॉप फिचर्स पाहता यात व्हॉइस असिस्टंट्स, स्मार्ट रिमोट, आणि PC मोड, स्क्रीन मिररिंग, टॅप व्यू मोड मिळतो. सॅमसंगचा हा स्मार्ट टीव्ही टाइजेन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, सोनी लिव, झी5, युट्युब सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात. या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत, जे डॉल्बी डिजिटल प्लसला सपोर्ट करतात.
प्राइस – 47,900 रुपये
डील प्राइस – 26,740 रुपये
LG 43 Inch UHD Ultra 4K TV
LG च्या 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K Ultra HD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेस रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, 3 HDMI पोर्ट, 1 USB पोर्ट आणि Bluetooth 5.0, Optical आणि Ethernet पोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर मिळतात. हा टीव्ही AI ThinQ & WebOS 22 वर चालतो. तसेच एलजीच्या या टीव्हीमध्ये Game Optimizer देखील देण्यात आला आहे. हा टीव्ही Netflix, Prime Video, Disney+ Hotstar, Apple TV, SonyLIV, Discovery+, Zee5 सारख्या अल्टीमेट ओटीटी अॅप्सना सपोर्ट करतो.
प्राइस – 49,990 रुपये
डील प्राइस – 25,490 रुपये
Acer 55 Inch series 4k UHD Series
Acer चा 55 इंचाचा 4K टीव्ही अॅमेझॉनवर सुरु असलेल्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्ट टीव्ही Android 11 प्लॅटफॉर्मवर चालतो. या टीव्हीमध्ये Dual Band Wifi, 2-वे Bluetooth सपोर्ट देण्यात आला आहे. यात ब्लू लाइट रिडक्शन इंटेलिजंट फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिन आणि डायनॅमिक सिग्नल कॅलिब्रेशन सारखे फीचर मिळतात. एसरच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Amazon Music, Hotstar,Spotify, Voot, VootKids, MxPlayer, SonyLiv, Hungama, Zee5, Eros Now सारखे अॅप्स प्री इंस्टॉल मिळतात.
प्राइस – 47,990 रुपये
डील प्राइस – 26,499 रुपये
Amazon Basic 43” 4K Smart TV
Amazon Basic चा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही सेल दरम्यान 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. या टीव्हीचे रिजोल्यूशन फुल एचडी 1920×1080 पिक्सल आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट, Blu-Ray पोर्ट, दोन USB पोर्ट आणि IR Port देण्यात आला आहे. या टीव्हीचा साउंड आउटपुट 20 Watts आहे. हा टीव्ही अॅमेझॉनच्या टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम Fire TV वर चालतो जो Alexa आणि Alexa व्हॉइस कंट्रोलला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये Prime Video, Netflix, Disney + Hotstar, YouTube सह 5000 पेक्षा जास्त अॅप्स Fire OS स्टोरवरून डाउनलोड करता येतील.
प्राइस – 44,000 रुपये
डील प्राइस – 18,249 रुपये
Redmi 43 Inch UHD Smart Led TV
Redmi 43-इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही कमी बजेटमध्ये चांगला ऑप्शन आहे. अॅमेझॉन सेलमध्ये हा टीव्ही आणखी स्वस्तात विकत घेता येईल. Redmi 43-इंचाच्या 4K Smart TV मध्ये 4K HDR Dolby Vision डिस्प्ले पॅनल मिळतो ज्यात Vivid Picture Engine देण्यात आलं आहे जो वाइब्रन्ट व्हिज्युअल ऑफर करतो. त्याचबरोबर हा टीव्ही अँड्रॉइड 10 आधारित PatchWall 4 UI वर चालतो. Redmi TV मध्ये पावरफुल 30W Dolby Audio स्पिकर मिळतो जो DTS-HD आणि DTS Virtual: X ला सपोर्ट करतो. Redmi 4K Smart TV व्हॅल्यू फॉर मनी स्मार्ट टीव्ही आहे जो शानदार साउंड आणि पिक्चर क्वॉलिटी देतो.
प्राइस – 42,999 रुपये
डील प्राइस – 21,249 रुपये
TCL 40 Inch FHD Smart LED TV
TCL चा 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही स्लिम डिजाइनसह येतो, ज्यात Full HD रिजोल्यूशन असलेला A+ ग्रेड पॅनल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले मायक्रो डिमिंग सपोर्ट आणि रिफ्रेश रेट 60Hz सह येतो. टीसीएलच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 1 USB पोर्ट आहे. या टीव्हीमध्ये 20 Watts आउटपुट आणि पावरफुल 2 स्टीरियो स्पिकर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये 64 bit Quad Core प्रोसेसर आणि 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज मिळते. यात Prime video, Youtube, Netflix सारख्या अॅप्सचा सपोर्ट मिळतो.
प्राइस – 15,291 रुपये
डील प्राइस – 15,291 रुपये
Amazon Basics 55’’ 4K UHD LED Fire TV
अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 55 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही सुमारे 50 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येईल. या टीव्हीच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 3840 x 2160 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. अॅमेझॉन बेसिकच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI 2.0 पोर्ट, 1 USB 3.0 आणि 1 USB 2.0 पोर्ट , IR पोर्ट देण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चा पावरफुल स्टीरियो स्पिकर आहे. हा टीव्ही अॅमेझॉनच्या Fire TV OS वर चालतो, ज्यात Netflix, Disney + Hotstar, YouTube सारखे अॅप्स प्रीइंस्टॉल मिळतात.
प्राइस – 60,000 रुपये
डील प्राइस – 30,749 रुपये














