भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार प्लान आहेत. यांच्या जीवावर कंपनी प्राइवेट कंपन्या एयरटेल आणि जियोला तगडे आव्हान देत आहे. बीएसएनएलकडे युजर्सचा कल बघता आज आम्ही BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या एका खास प्लानची माहिती तुम्हाला देणार आहोत ज्यात डेली डेटा सोबतच अजून अनेक बेनिफिट्स मिळतील. जर तुम्ही पण बीएसएनएल युजर असाल आणि 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लानचा शोध घेत असाल तर इथे तुमचा शोध पूर्ण होणार आहे. आज आम्ही बीएसएनएलच्या ज्या प्लानबाबत बोलत आहोत त्याची किंमत फक्त 100 रुपयांपेक्षा कमी नाही तर 70 रुपयांपेक्षा कमी आहे. चला जाणून घेऊया या रिचार्ज बाबत सर्वकाही. (BSNL 21GB data prepaid recharge plan to counter Jio Airtel under 100)
68 रुपयांचा BSNL चा प्लान
BSNL च्या या रीचार्ज प्लानची किंमत फक्त 68 रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला रोज 1.5GB डेटा वापरासाठी कंपनीद्वारे मिळतो. जर या प्लानमध्ये तुम्हाला 14 दिवसांची वैधता मिळेल. या हिशोबाने या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 14 दिवस 21GB डेटा वापरासाठी मिळेल. डेटाव्यतिरिक्त, बीएसएनएलच्या या पॅकमध्ये आणि कोणतेही बेनेफिट्स तुम्हाला मिळणार नाहीत.
हे देखील वाचा : Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री
BSNL च्या प्रतिस्पर्ध्यांबाबत बोलायचे झाले तर जियो, एयरटेल व वोडाफोन आयडिया अशाप्रकारचा रीचार्ज पॅक ऑफर करत नाहीत. त्यामुळे हा प्लान अजून खास ठरतो. जर तुम्ही एका शानदार बीसएनएल प्लानचा शोध घेत असाल तर या प्लानचा रिचार्ज करू शकता.
हे देखील वाचा : 8GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट असलेला Vivo Y52s 5G फोन
BSNL चा सर्वात स्वस्त मंथली रिचार्ज
BSNL चा रिचार्ज देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळा आहे. पण कंपनीच्या सर्वात स्वस्त मंथली रिचार्जबद्दल बोलायचे तर तो 187 रुपयांचा आहे. या प्रीपेड रिचार्जमध्ये युजर्सना 28 दिवसांच्या वॅलिडिटीसोबतच डेली 2जीबी डेटा दिला जात आहे. कोणत्याही नंबरवर अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा पण या रिचार्जमध्ये मिळते. तुम्हाला सांगू इच्छितो कि प्लान एमटीएनएलच्या सर्कल्स जसे कि दिल्ली आणि मुंबईत पण पूर्णपणे काम करेल.
