Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री

Samsung Galaxy M31s चा फोटो

Samsung कंपनीने अलीकडेच भारतीय टेक मंचावर आपला नवीन 5G स्मार्टफोन Galaxy M42 लॉन्च केला आहे. गॅलेक्सी एम42 बाजारात आल्यानंतर आता सॅमसंगच्या Galaxy M-सीरीजमध्ये यांच्या दुसऱ्या फोन Samsung Galaxy M32 बद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. बोलले जात आहे कि कंपनी या फोनवर पण काम करत आहे आणि लवकरच हा टेक मार्केटमध्ये सादर करेल. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. Galaxy M32 कंपनीद्वारे सादर केलेल्या Galaxy M31s चा सक्सेसर वाटत आहे. जो आता Geekbench वर स्पॉट केला गेला आहे. लिस्टिंगमध्ये या अपकमिंग 4G स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. चला एक नजर टाकूया या फोनवर. (Samsung Galaxy M32 4G Geekbench listing specification launch soon)

Samsung Galaxy M32 4G झाला Geekbench वर स्पॉट

लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि गॅलेक्सी एम-सीरीजचा हा फोन मॉडेल नंबर SM-M325FV सह स्पॉट केला गेला आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये “Titan Marmot” मदरबोर्डची पावर असेल. हे कोडनेम MediaTek Helio G80 चिपचे आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. आम्हाला आशा आहे कि फोनमध्ये वनयुआय 3.0 टॉप अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम असेल.

हे देखील वाचा : ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी

Samsung Galaxy M32 4G गिकबेंच स्कोर

गीकबेंच लिस्टिंगवरून डिवाइसच्या सिंगल-कोर आणि मल्टी-कोर टेस्ट स्कोरची माहिती मिळाली आहे. या दोन्ही टेस्टमध्ये क्रमश: 361 आणि 1254 स्कोर देण्यात आला आहे. याआधी सॅमसंग गॅलेक्सी एम32 ला DEKRA सर्टिफिकेशन एजेंसीवर स्पॉट केला गेला होता, ज्याची माहिती सॅममोबाईलच्या माध्यमातून समोर आली होती.

या लिस्टिंगमध्ये खुलासा झाला होता कि सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीसह बाजारात येईल. सर्टिफिकेशन्स साइटवर बॅटरीची रेटेड कपॅसिटी 5,830एमएएच सांगण्यात आली आहे. इथे बॅटरीचा मॉडेल नंबर पण नोंदवण्यात आला आहे जो EB-BM325ABN आहे. या लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले होते कि Samsung Galaxy M32 मध्ये 6,000एमएएचची बॅटरी असेल.

GalaxyA32 4g कॅमेरा

Samsung Galaxy M32

सॅमसंग गॅलेक्सी एम32 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्टनुसार हा फोन बऱ्याच अंशी गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन सारखा असेल. या फोनमध्ये 6.4 इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च होईल आणि सॅमसंग वनयुआय 3 वर काम करेल. फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे.

हे देखील वाचा : Jio चे 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 3 प्लान, देतील रोज 2GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M32 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो तसेच 8 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचे दोन इतर सेंसर फोनमध्ये दिले जाऊ शकतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम32 मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक्समध्ये समोर आले आहे.

Samsung Galaxy M32 बद्दल सांगू इच्छितो कि हा एक 4G फोन असेल जो डुअल सिम सपोर्टसह लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी ए32 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली होती तर गॅलेक्सी एम32 स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी मिळेल. सॅमसंग हा फोन कधी बाजारात घेऊन येईल हे अजून समजले नाही पण आशा आहे कि कंपनी Samsung Galaxy M32 च्या लॉन्चमध्ये जास्त वेळ घेणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here