8GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट असलेला Vivo Y52s 5G फोन

VIVO Y52S चा फोटो

Vivo ने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आपला 5G फोन सादर करत हुए Vivo Y52s लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेटसह बाजारात आला होता ज्याची बेस किंमत 18,000 रुपयांच्या आसपास आहे. आता वीवोने आपल्या या फोनमध्ये नवीन फेरबदल करून अजून एक मॉडेल मार्केटमध्ये सादर केला आहे. वीवो वाय52एस चा हा नवीन मॉडेल क्वॉलकॉम प्रोसेसरने सुसज्ज केला गेला आहे जो स्नॅपड्रॅगॉन 480 5जी चिपसेटसह चालतो. (Vivo Y52s T1 edition Snapdragon 480 5G version launch specs price)

Vivo Y52s च्या या नवीन मॉडेलला Vivo Y52s (t1 edition) नाव देण्यात आला आहे जो सध्या चीनी बाजारात लॉन्च झाला आहे. वीवो वाय52एस चा पहिला मॉडेल मीडियाटेक डायमनसिटी 720 चिपसेटला सपोर्ट करत होता तर या नवीन मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट देण्यात आला आहे. हे दोन्ही चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतात तसेच डुअल बॅंड 5जी वर काम करतात. मीडियाटेक व क्वॉलकॉम दोन्ही कंपन्यांचे हे चिपसेट मिडबजेट फोनसाठी बनवण्यात आले आहेत.

VIVO Y52S चा फोटो

Vivo Y52s (t1 edition)

वीवो वाय52एस च्या या नवीन एडिशनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20.1:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1080 × 2408 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करत आहे. या नवीन ओपो फोनचे डायमेंशन 164.15×75.35×8.40एमएम आणि वजन 185.5 ग्राम आहे.

हे देखील वाचा : Jio चे 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 3 प्लान, देतील रोज 2GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग

Vivo Y52s (t1 edition) अँड्रॉइड ओएसवर लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेटवर चालतो. हा फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो वाय52एस च्या नवीन एडिशनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन Coral Sea, Monet आणि Titanium Gray कलरमध्ये बाजारात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय52एस टी1 एडिशन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे सोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here