BSNL युजर्ससाठी खुशखबर! दोन आठवड्यात लाँच होऊ शकते 4G सर्व्हिस, असा आहे सरकारचा प्लॅन

Highlights

  • केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं 4जी-5जी टेलीकॉम स्टॅक आम्ही भारतात विकसित केला आहे.
  • चंदिगढ आणि देहरादून दरम्यान 200 साइट्स स्थापना करण्यात आल्या आहेत.
  • टीसीएसला मिळालं कंत्राट.

बीएसएनएल 4जी ची वाट बघत असलेल्या युजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय आयटी आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की दोन आठवड्यात बीएसएनएल 4G लाँच होईल. त्यांनी म्हटलं आहे की बीएसएनएल लवकरच 200 साइट्ससह 4जी नेटवर्क सुरु करेल. तसेच, तीन महिन्याच्या टेस्टिंग दरम्यान कंपनीनं रोज सरासरी 200 साइट्स लाँच करेल. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांनी सांगतील आहे की नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत बीएसएनएलचं 4जी नेटवर्क 5जी वर अपग्रेड केलं जाईल.

200 साइट्स उभारणार

तसेच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितलं आहे की 4जी-5जी टेलीकॉम स्टॅक आम्ही भारतात विकसित केला आहे. ह्या स्टॅकची उपयोजन बीएसएनएलसह सुरु झालं आहे. चंदिगढ आणि देहरादून दरम्यान 200 साइट्स स्थापना करण्यात आल्या आहेत आणि जास्तीत जास्त दोन आठवड्यात ह्या लाइव्ह होतील.

7-10 दिवसांत 4G सिम आणि सर्व्हिस

मीडिया रिपोर्ट्स नुसार, 4G सर्व्हिस पंजाबच्या दोन शहरांमध्ये ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत लाइव्ह केली जाईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अमृतसर आणि फिरोजपुरमध्ये सर्व्हिस लाइव्ह केली जाईल. तसेच, येत्या 7-10 दिवसांत सर्व्हिस आणि 4जी सिम शुरु होईल.

संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितलं होतं की बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कसाठी स्वदेशी टेलीकॉम स्टॅक सेटअपचं गेल्यावर्षी टेस्टिंग करण्यात आली होती आणि एकत्र 10 मिलियन कॉल्सचा भार सांभाळू शकतं.

TCS ला मिळालं कंत्राट

विशेष म्हणजे बीएसएनएलनं 1.23 लाखांपेक्षा साइट्स 4जी नेटवर्कच्या उपयोजनेसाठी टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेज आणि आयटीआय लिमिटेडला कंत्राट देण्यात आलं आहे. BSNL च्या 4जी नेटवर्कसाठी टीसीएस देशातील सुमारे एक लाख साइट्सवर इंस्टॉलेशन आणि देखभालीचं काम करेल.

बीएसएनएलनं टीसीएस-सी-डॉट च्या नेतृत्वातील कंसोर्टियमसह 100,000 4जी साइट्ससाठी आयटीआयला 15,000 कोटी रुयांच्या 4जी उपकरणांसाठी अ‍ॅडव्हान्स खरेदीचे आदेश दिले होते, जे पुढील 18 महिन्यात 4जी रोलआउट मध्ये मदत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here