Home बातम्या Jio ची बोलती बंद! BSNL Plan मध्ये 80 दिवस मिळेल Unlimited Data, Calls आणि SMS

Jio ची बोलती बंद! BSNL Plan मध्ये 80 दिवस मिळेल Unlimited Data, Calls आणि SMS

BSNL Long Validity Plan: भारतीय टेलिकॉम बाजारात Jio-Airtel नं आपला दबदबा बनवला आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या स्वस्त आणि जास्त बेनिफिट्स देणाऱ्या प्लॅन्सच्या (Prepaid Plan) माध्यमातून सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला चांगली टक्कर देत आहेत. बीएसएनएल देखील अधूनमधून काही असे दमदार प्लॅन्स सादर करते, जे पाहून जियोची बोलती देखील बंद होते. BSNL (BSNL Prepaid Plan) कडे असे अनेक प्लॅन्स आहेत जे कमी किंमतीत फक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत नाहीत तर दीर्घ वैधता आणि भरपूर डेटा देखील देतात. आज आम्ही आमच्या आर्टिकलमध्ये तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच प्लॅन (BSNL 499 Plan Detail) ची माहिती देणार आहोत, ज्यात Long Validity सोबतच Unlimited Data, Calls आणि SMS ची सुविधा दिली जात आहे.

BSNL Prepaid Plan ची किंमत

आम्ही तुम्हाला आज या आर्टिकलमध्ये ज्या प्रीपेड प्लॅनची माहिती देणार आहोत, त्याची किंमत 500 रुपयांपेक्षा देखील कमी असेल. आम्ही कंपनीच्या 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबाबत बोलत आहोत, जो किंमतीच्या मानाने अनेक शानदार बेनिफिट्स देतो. पुढे आम्ही तुम्हाला मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: मूर्ती लहान पण रेंज महान! क्युट लूकसह 4 सीटर हटके Micro EV लाँच, जाणून घ्या किंमत

OTT बेनिफिट्स

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला OTT वर कंटेंट बघायला आवडत असेल तर हा प्लॅन तुम्हाला खूप आवडेल कारण यात OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना Zing आणि Eros Now चं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं, यातील कंटेंट तुम्ही फोन, टीव्ही, टॅबलेटवर बघू शकता.

160 जीबी डेटा

या रिचार्ज प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा मिळतो. परंतु, प्लॅनची वैधता 80 दिवस आहे त्यामुळे युजर्सना एकूण 160GB डेटा वापरता येतो. कंपनी सध्या 3G स्पीडवरच इंटरनेट देत आहे. परंतु बातम्यांनुसार लवकरच BSNL 4G लाइव्ह होणार आहे. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Samsung सज्ज! 6GB RAM आणि 48MP कॅमेरा असलेल्या Galaxy A24 चे स्पेसिफिकेशन्स लीक

अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि एसएमएस

BSNL च्या 499 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल. तसेच, ग्राहकांना रोज 100 SMS ची सुविधा दखल दिली जात आहे. म्हणजे जर दीर्घ वैधता आणि डेटासह अनलिमिटेड कॉलिंगसाठी बीएसएनएल प्लॅनच्या शोधात असाल तर हा एक चांगला ऑप्शन म्हणता येईल.

Note: बीएसएनएलचे प्लॅन संपूर्ण देशात वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या बेनिफिट्ससह येतात. रिचार्ज करण्याआधी प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती कंपनीच्या साइट किंवा बीएसएनएल कस्टमर केयर कडून घेण्याचा सल्ला 91मोबाइल्स देत आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.