बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Samsung सज्ज! 6GB RAM आणि 48MP कॅमेरा असलेल्या Galaxy A24 चे स्पेसिफिकेशन्स लीक

Samsung Galaxy A24 might launch with 6gb ram 48mp camera Exynos 7904 processor specifications leaked

Samsung गेली कित्येक दिवस भारतीय बाजारात सक्रिय नव्हती परंतु काही दिवसांपूर्वी कंपनीनं आपल्या ‘एम’ सीरीजमध्ये नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy M32 Prime Edition लाँच केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G80 चिपसेट आणि 6,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. सॅमसंग संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे की कंपनी लवकरच Samsung Galaxy A24 देखील लाँच करणार आहे.

Samsung Galaxy A24

सॅमसंग गॅलेक्सी ए24 ची माहिती द पिक्सलच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यांनी फोन लाँचच्या आधीच याचे स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, रिपोर्टनुसार Samsung Galaxy A24 स्मार्टफोन 6.24 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल जो सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल, तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत लाँच होऊ शकतो POCO C50; भारतातील लाँचची माहिती लीक

Samsung Galaxy A24 might launch with 6gb ram 48mp camera Exynos 7904 processor specifications leaked

Samsung Galaxy A24 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन कंपनीच्या एक्सनॉस 7904 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. जो 14नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला प्रोसेसर आहे, ज्याच्या जोडीला माली जी71 जीपीयू मिळेल. लीकनुसार हा मोबाइल फोन 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. या फोनचे आणखी व्हेरिएंट बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए24 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळेल. फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy A24 स्मार्टफोन 4,000एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो जी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M32 Prime Edition

सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच

सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन 6 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here