क्युट लूकसह 4 सीटर Micro EV लाँच; लांबी फक्त 3.41 मीटर

जर्मनीच्या ऑटोमोबाइल निर्माता कंपनी e.go नं Paris Motor Show 2022 मध्ये आपली Micro EV e.wave x सादर केली आहे. कंपनीचा हा दुसरा नवीन EV प्रोडक्शन मॉडेल आहे, जो ईगो लाइफच्या क्रॉसओव्हर व्हेरिएंटच्या रूपात समोर आला आहे. या नवीन आकर्षक EV ची लांबी फक्त 3.41 मीटर आहे. म्हणजे हिला सर्वात छोटी Ev कार देखील म्हणता येईल. खास बाब म्हणजे या मायक्रो ईव्हीमध्ये 3 डोर असेलेल्या या छोट्या ईव्हीमध्ये 4 लोक बसू शकतात. तसेच नवीन EV मध्ये 86 kW ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 107 बीएचपीची पावर देते. पुढे आम्ही Micro EV e.wave x च्या सर्व फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

e.wave x EV डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नवीन Micro EV, e.wave x चा लूक खूप फंकी आहे, काहींना ही क्युट वाटू शकते. नवीन e.wave x इलेक्ट्रिक कारमध्ये युजर्सना राउंड हेडलॅम्प्स, LED DRL, रॅली-स्टाइल लाइट आणि सिल्व्हर बंपर देण्यात आला आहे. तुम्ही फोटोजमध्ये पाहू शकता की कारच्या बाजूला रुंद फेंडर फ्लेयर्स, 18-इंच व्हील्स आणि सिंगल डोर दिसत आहे. तसेच कारमध्ये सुंदर इंटीरियर डॅशबोर्ड, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि डिजिटल इंफोटेनमेंट डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या खालच्या बाजूला कारमध्ये लेदर अपहॉल्स्ट्री, अ‍ॅल्यूमीनियम-स्टाइल प्लास्टिक ट्रिम आणि मध्यभागी कंसोलवर वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील मिळते. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत लाँच होऊ शकतो POCO C50; भारतातील लाँचची माहिती लीक

e-go-ewave-x-micro-ev-revealed-know-features-and-price

e.wave x पावर आणि चार्जिंग

e.wave x Electric Car ची पावर पाहता यात सिंगल इलेक्ट्रिक मोटर 107 बीएचपी पावर देते. कारमध्ये रियर व्हील ड्राईव्ह फीचर देण्यात आलं आहे ज्यात इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट सारखे तीन ड्राईव्हिंग मोड मिळतात. रेंज बद्दल बोलायचं झालं तर ही कार फुल चार्जवर 240 किमी धावू शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. त्याचबरबर कार 11 kW चार्जरच्या मदतीनं चार्ज करता येईल.

e.wave x Ev Car ची किंमत

ऑटोमोबाइल निर्माता e.go ची नवीन e.wave X सध्या बुकिंगसाठी उपलब्ध आहे. जिची डिलिव्हरी साल 2022 च्या अखेरीस सुरु होईल. किंमत पाहता e.go e.wave X युरोपियन बाजारात 24,990 युरो म्हणजे भारतीय करन्सीनुसार सुमारे 20 लाख रुपयांमध्ये सेल केली जाईल. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Samsung सज्ज! 6GB RAM आणि 48MP कॅमेरा असलेल्या Galaxy A24 चे स्पेसिफिकेशन्स लीक

इथे पाहा व्हिडीओ:

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here