Home बातम्या BSNL 1499 रुपयांमध्ये देत आहे 12 महिन्यांची वैधता

BSNL 1499 रुपयांमध्ये देत आहे 12 महिन्यांची वैधता

BSNL 12 Month Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL (Mobile Prepaid Plans) अनेक दिवसांपासून Jio, Airtel, Vodafone Idea सारख्या खाजगी कंपन्यांना तगडे आव्हान देत आहे. BSNL (BSNL Recharge Plan 2022) कडे असे अनेक प्लॅन आहेत जे बऱ्याच बाबतीत प्रायव्हेट कंपन्यांच्या रिचार्ज पेक्षा चांगले आहेत. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका प्लॅनची माहिती देणार आहोत जो कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक वैधता असलेला प्लॅन (BSNL 1 year Validity Plan 2022) आहे. हा रिचार्ज केल्यानंतर दर महिन्याला रिचार्जचं झंझट राहणार नाही. या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा, कॉलिंग, SMS सह अनेक बेनिफिट्स मिळतात. आइए पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅनची संपूर्ण माहिती दिली आहे.

रोजचा खर्च 4 रुपये 1 पैसा

BSNL च्या 1499 रुपयांचा प्लॅनमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी मिळते जो कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन आहे. या प्लॅनचा दिवसाला सरासरी खर्च 4 रुपये 1 पैसा पडतो. या प्लॅनमध्ये डेली 100 एसएमएस देखील मिळतात. इतकेच नव्हे तर 365 दिवसांची वैधता दरम्यान ग्राहकांना एकूण 24 जीबी इंटरनेट डेटा दिला जातो. जर तुम्ही जास्त डेटा वापरत नसाल तर तुम्हाला कदाचित हा प्लॅन आवडेल. हे देखील वाचा: Upcoming Electric Cars 2023: फक्त इलेक्ट्रिक Wagnor नव्हे तर या कार्स येत आहेत पुढील वर्षी, जाणून घ्या किंमत आणि लाँच डेट!

या रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. हा प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहक BSNL वेबसाइटवर जाऊ शकतात. किंवा त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 123 नंबर वर PLAN BSNL1499 असा एसएमएस करू शकतात. जे लोक कॉलिंगसाठी फोनचा जास्त वापर करतात त्यांच्यासाठी बीएसएनलचा 1499 रुपयांच्या प्लॅन बेस्ट ठरू शकतो.

15 ऑगस्टला BSNL करू शकते मोठी घोषणा

BSNL च्या 5जी लाँच बद्दल आतापर्यंत फक्त एकच बातमी आली होती परंतु जास्तीत जास्त बातम्यांमध्ये 4G ची चर्चा सुरु होती. एका रिपोर्टनुसार, BSNL TCS सह मिळून सुरुवातीला 4G कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी देऊ शकते जिथे रेवेन्यू जास्त असेल. 4G-रेडीचा इंफ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि हा संपूर्ण देशात रोल आउट केलं जाऊ शकतं. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत होईल Moto G Play (2022) ची एंट्री; चार कॅमेऱ्यांसह येणार Motorola ला आगामी फोन

भारतात 5जी नेटवर्क नो स्टॅन्डअलोन (NSA) मोडमध्ये 15 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सना एन्ड-टू-एन्ड 5G नेटवर्कची 5जी सर्व्हिस दिली जाईल परंतु यात बीएसएनएलच्या नावाचा समावेश असेल की नाही हे आता सांगता येणार नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.