Moto G Play (2022) चे स्पेसिफिकेशन्स लागले आमच्या हाती; रेंडर इमेजेस देखील लीक

Motorola भारतीय बाजारात सध्या जास्तच सक्रिय होत आहे. मिड रेंज आणि हाय एन्ड सेगमेंटनंतर आता कंपनी लो बजेटकडे आपला मोर्चा वळवण्याची तयारी करत आहे. 8,000 रुपयांच्या बजेटमधील Realme, Redmi, Vivo आणि OPPO सह Infinix व Tecno सारख्या ब्रँड्सना आव्हान देण्यासाठी मोटोरोला कंपनी Moto G Play (2022) स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. 91मोबाइल्सनं बाजारात येण्याआधीच मोटो जी प्ले 2022 मॉडेलची रेंडर ईमेज आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत जो कमी किंमतीत लाँच जाऊ शकतो.

Moto G Play (2022) चा लुक व डिजाईन

मोटो जी प्ले (2022) स्मार्टफोन पंच-होल स्टाईल डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही फ्लॅट स्क्रीन असू शकते जिच्या तीन कडा ज्या बेजल लेस आणि खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आणि वरच्या एजवर स्पिकर फिट असू शकतो. हे देखील वाचा: Samsung Galaxy M23 5G येतोय भारतात, Realme 10 आणि Redmi Note 12 Series ला टक्कर देण्याची तयारी

low budget mobile phone Motorola moto g play 2022 launch soon specifications price leaked

Moto G Play (2022) मधील ट्रिपल रियर कॅमेरा फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे असू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये तिन्ही लेन्स वर्टिकल पॉजिशनमध्ये आणि बाजूला एलईडी लाईट व लेन्स डिटेल असू शकतात. रियर पॅनलवर Motorola लोगो, उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन तर डाव्या पॅनलवर सिम स्लॉट मिळू शकतो. लोवर पॅनलवर यूएसबी टाईप-सी पोर्ट तसेच स्पिकर ग्रिल मिळू शकते.

Moto G Play (2022) फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

मोटो जी प्ले (2022) चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड गो एडिशन वर लाँच होऊ शकतो ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेट मिळू शकतो. ग्राफिक्ससाठी या मोटोरोला मोबाइल फोनमध्ये आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयू असू शकतो. Moto G Play (2022) स्मार्टफोन 3 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो जोडीला 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

low budget mobile phone Motorola moto g play 2022 launch soon specifications price leaked

Moto G Play (2022) च्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. पावर बॅकअपसाठी मोटो जी प्ले (2022) मध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी 10वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हे देखील वाचा: New OTT Releases: TVF चा गोड वेब सीरिजचा तिसरा सिझन आला; या विकेंडला हे चित्रपट येतील ओटीटीवर

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here