फक्त इलेक्ट्रिक Wagnor नव्हे तर ‘या’ कार्स येत येऊ शकतात पुढील वर्षी, पाहा यादी

एका रिपोर्टनुसार भारतीय ईव्ही बाजारात 2021 आणि 2030 दरम्यान 49 टक्क्यांनी वाढ होणार आहे. म्हणजे आगामी काळ इलेक्ट्रिक कार्सचा असेल, असं म्हणता येईल. याची चाहूल पुढील वर्षीपासून लागायला सुरु होईल. 2023 मध्ये एकपेक्षा एक नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच होऊन बाजाराचं रंगरूप बदलणार आहेत. जर तुम्ही देखील त्या एक नवीन ईव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला थांबण्याचा सल्ला देऊ. कारण नवीन फीचर्स असलेल्या नवीन कार्स नक्कीच तुम्हाला आकर्षित करतील. आज या आर्टिकलमध्ये तुम्हाला Upcoming Electric Cars 2023 ची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही आताच तुमची नवीन ईव्ही निवडून ठेवू शकता.

2023 मध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स

जर तुम्ही नवीन वर्षात लेटेस्ट इलेक्ट्रिक कार मॉडेल विकत घेण्याची योजना बनवत असाल तर खाली अपकमिंग इलेक्ट्रिक कार्सची यादी दिली आहे ज्या पुढील वर्षी देशात उपलब्ध होतील किंवा लाँच होतील.

  • Tata Altroz EV
  • Citron C3 EV
  • Maruti Wagnor EV
  • Mahindra XUV 400 EV
  • Hyundai IONIQ 5
  • Tesla Model 3
  • MG City EV
  • Ola Electric Car
  • Renault 4 EV
  • Ford Mustang Mach E

Tata Altroz EV

टाटा मोटर्सनं काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार TATA Tiago EV सादर केली होती. परंतु या कारची डिलिव्हरी सुरु झाली नाही. दुसरीकडे बातमी आली आहे की येत्या काळात अल्ट्रोज हॅचबॅकची इलेक्ट्रिक व्हेरिएंट कंपनी Altroz EV नावानं सादर करू शकते. ही कार कंपनी पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये सादर करेल, अशी चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार अल्ट्रोज इलेक्ट्रिक टाटा कंपनीच्या Ziptron टेक्नॉलजीसह सादर केली जाईल. तसेच या कारमध्ये 200 किलोमीटरची रेंज मिळू शकते. प्राइस पाहता अल्ट्रोज इलेक्ट्रिक भारतात 10 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या बेस प्राइसमध्ये उपलब्ध होऊ शकते.

Citroen C3 EV

काही दिवसांपूर्वीच सिट्रोन इंडियानं आपला नवीन सी3 पेट्रोल मॉडेल लाँच केला होता, ज्याला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. आता बातमी आहे की कंपनी हिचा इलेक्ट्रिक व्हर्जन भारतात आणण्याची योजना बनवत आहे जो पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये लाँच केला जाईल. कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक कार सिट्रॉन ओली ईव्ही (Oli EV) कॉन्सेप्ट मॉडेल काही दिवसांपूर्वीच सादर केला आहे जो Citroen C3 Ev नावानं 2023 मध्ये सादर केली जाऊ शकते. कंपनीनं अजूनही अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितलं नाही.

Maruti Wagon R EV

Image: Abhishek Panjoo

मारुतीच्या लोकप्रिय पेट्रोल व सीएनजी व्हर्जन वॅगनआरचा ईव्ही मॉडेल भारतात आतापर्यंत अनेकदा स्पॉट केला गेला आहे. परंतु, कंपनीनं आतापर्यंत याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. आतापर्यंत समोर आलेल्या वॅगनआर ईव्हीचे फोटोज पाहून एक म्हणता येईल की ईव्हीचा फ्रंट प्रोफाईल वगळता जवळपास आयसीई व्हर्जन सारखीच दिसते. या ईव्हीमध्ये इग्निस प्रमाणे 15 इंचाचे टायर्स असू शकतात. तसेच रिपोर्ट्सनुसार ही इलेक्ट्रिक कार एक तासात 80% चार्जमध्ये फास्ट चार्जिंगसह 180km ची रेंज देऊ शकते. मोठ्या रेंजसह हिची किंमत 10 लाखांच्या आसपास असू शकते.

Mahindra XUV 400 EV

Mahindra XUV400 ev competition electric cars in india

Mahindra XUV 400 EV काही दिवसांपूर्वी कंपनीनं अनवील केली होती. परंतु जानेवारी 2023 च्या अखेरपर्यंत या कारची डिलिव्हरी सुरु केली जाईल. किंमतीची माहिती मात्र समोर आलेली नाही, परंतु हिची प्राइस TATA Nexon EV Max च्या आसपास असण्याची शक्यता आहे. या कारचा लुक कंपनीच्या XUV300 प्रमाणे आहे फक्त आकार मोठा आहे. ही EV सिंगल चार्जमध्ये सुमारे 400-450 किलोमीटर पर्यंत चालू शकते. हीचा टॉप स्पीड 150 kmph आहे.

Hyundai IONIQ 5

Hyundai Ioniq 5 देखील त्या ईव्ही पैकी एक आहे, जिची भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. ही कार ग्लोबल मार्केटमध्ये आधीच लाँच झाली आहे. आता हिच्या भारतीय लाँचची प्रतीक्षा आहे. पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हिरे सादर केली जाऊ शकते. ग्लोबली ही दोन पावरट्रेन ऑप्शनसह येते. तसेच कारमध्ये 72.6kWh आणि 58kWh चे दोन बॅटरी पॅक ऑप्शन देखील मिळतात. तसेच ही कार काही दिवसांपूर्वी भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान देखील स्पॉट करण्यात आली होती.

Tesla Model 3

Tesla च्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. आता काही मीडिया रिपोर्ट्सनुसार Tesla Model 3 भारतात कंपनीची पहली इलेक्ट्रिक कार असू शकते, जी अमेरिकेन कंपनीची एंट्री लेव्हल कार आहे. ही कार पुढील वर्षी सादर केली जाऊ शकते. टेस्ला मॉडेल 3 भारतात 2 व्हेरिएंटमध्ये येऊ शकते, ज्यांची बॅटरी रेंज सिंगल चार्जवर 423 किलोमीटर पासून 568 किलोमीटर पर्यंत असू शकते. पुढील वर्षी लाँचच्या आधी टेस्ला मॉडेल 3 च्या लुक आणि फीचर्सची अधिक माहिती मिळेल.

MG City EV

MG नं भारतात आधीदेखील आपली इलेक्ट्रिक कार्सच्या जीवावर ग्राहकांना आकर्षित करण्यासोबतच टाटाला टक्कर दिली आहे. MG Motor India देशात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी करत आहे. कंपनी आपली कार MG City EV नावानं पुढील वर्षी 2023 मध्ये एप्रिल-जूनच्या आसपास सादर करू शकते. हिची खासियत म्हणजे ही दोन सीटर इलेक्ट्रिक व्हेईकल असेल जी गर्दीच्या रस्त्यांवर देखील सहज ड्राईव्ह करता येईल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार टू-सीटर असल्यामुळे ही कंपनीची आणि देशातील देखील सर्वात स्वस्त कार असू शकते. परंतु लाँच आणि ऑफिशियल प्राइस समोर येईस्तोवर काहीच सांगता येणार नाही.

Ola Electric Car

आपली इलेक्ट्रिक स्कूटर सादर करून इलेक्ट्रिक कारच्या मार्केटवर कब्जा करण्यासाठी ओला इलेक्ट्रिक पूर्णपणे तयार दिसत आहे. कंपनी आपल्या आगामी OLA Electric Car बद्दल अनेक दिवसांपासून व्हिडीओ टीजर शेयर करत आहे. अलीकडेच कंपनीनं OLA EV चा लेटेस्ट व्हिडीओ टीज केला होता, ज्यात कारचा लुक समोर आला होता. ही कार 2024 पर्यंत भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकते. परंतु काही रिपोर्ट्सनुसार कार पुढील वर्षी अनवील केली जाऊ शकते. कंपनी हिची प्राइस 25 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेऊ शकते.

Renault 4 EV

टाटा, महिंद्रा आणि एमजी नंतर पुढील वर्षी Renault देखील आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात आणू शकते. कंपनी भारतात 2023 पर्यंत Renault 4 EV सादर करू शकते. या एसयूव्हीचा कॉन्सेप्ट मॉडेल 2022 पॅरिस मोटर शो मध्ये सादर केला गेला आहे. या एसयूव्हीचे प्रोडक्शन रेनोच्या इलेक्ट्रिक कार Renault 5 EV च्या प्रोडक्शन सोबतच सुरु होईल. रेनॉल्ट 4 ईव्ही बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला 4 दरवाज्यांसोबतच लांबपल्याची रेंज आणि ऑफ रोडिंगचा अनुभव मिळू शकतो.

Ford Mustang Mach E

भारतातून आपला कारभार आटोपल्यानंतर Ford पुन्हा एकदा भारतात पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकन कंपनी फोर्ड यावेळी भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये कम बॅक करेल. Ford Mustang Mach E सह कंपनी पुढील वर्षी बाजारात येईल, जिची एक्स शोरूम प्राइस 70 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. ग्लोबल लेव्हलवर या कारमध्ये 88 KWH च्या बॅटरीचा वापर करता येईल. ही कार 621 किलोमीटरची रेंज देते जी 800 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here