32 ते 55 इंचांमध्ये येतात हे आश्चर्यकारक LED आणि QLED स्मार्ट टीव्ही, किंमत फक्त 10,999 रुपयांपासून सुरू

जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. वास्तविक, Daiwa ने 32 ते 55 इंचाची एचडी आणि 4K (युएचडी) गुगल टीव्ही ची नवीन श्रेणी बाजारात लाँच केली आहे. यामध्ये एलईडी आणि क्यूएलईडी मॉडेल्सचा समावेश आहे. हे सर्व तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर मिळेल.

Daiwa गुगल टीव्ही 32 इंच एलईडी एचडी आणि क्यूएलईडी एचडी टीव्हीचे स्पेसिफिकेशन

  • डिझाईन: 32 इंचाच्या या दोन्ही टीव्हींना डायमंड कट डिझाईनमध्ये सादर केले गेले आहे. जे बेझल-लेस आहेत.
  • डिस्प्ले: 32 इंचाची एचडी रेडी आणि क्यूएलईडी एचडी रेडी मध्ये (1366 x 768) रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 178-डिग्री व्ह्यूईंग अँगल, 16:9 आस्पेक्ट रेशो, 16.7 दशलक्ष रंग मिळत आहेत.
  • प्रोसेसर: या दोन्ही टीव्हीमध्ये एआरएम क्वाड-कोर A55x4 चिप आणि G31x2 (700MHz) जीपीयू दिला गेला आहे.
  • सॉफ्टवेअर: कंपनीने 32 इंचाच्या दोन्ही टीव्हीमध्ये गुगल टीव्ही, गुगल व्हॉईस असिस्टंट, किड्स प्रोफाईल, बिल्ट-इन क्रॉमकास्ट दिलेले आहे.
  • कनेक्टिव्हिटी: टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, ड्युअल बँड वाय-फाय सिस्टम आहे.
  • स्टोरेज: यात 8GB स्टोरेजसह 1.5GB रॅम मिळेल.
  • इतर फिचर्स: टीव्हीमध्ये एचडीआर 10, एएलएलएम, आय केअर मोड देखील उपलब्ध आहे. तसेच, 3 एचडीएमआय, 2 यूएसबी 2.0, 1 ऑप्टिकल, एव्ही इन, इअरफोन आऊट, आरजे45 एलएएन आणि 20W चे 2 स्पीकर डॉल्बी ऑडिओमध्ये मिळत आहेत. इतकंच नाही तर ऑन-स्क्रीन गुगल कीबोर्ड, डायलॉग एन्हान्सर, व्हर्च्युअल रिमोट, ऑन/ऑफ टायमर, चाईल्ड लॉक आणि पॅरेंटल कंट्रोल, ॲम्बियंट मोड देखील देण्यात आला आहे.

43 आणि 55 इंच 4K एलईडी आणि 4K क्यूएलईडी गुगल टीव्हीचे स्पेसिफिकेशन

  • डिझाईन: या दोन्ही टीव्हींना डायमंड कट डिझाईनमध्ये सादर केले गेले आहे. जे बेझल-लेस आहेत.
  • डिस्प्ले: दोन्हींमध्ये 3840 x 2160 4K रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 178-डिग्री व्ह्यूईंग अँगल, 16:9 आस्पेक्ट रेशो, 16.7 दशलक्ष रंग मिळतात.
  • प्रोसेसर: एआरएम क्वाड-कोर A55x4 प्रोसेसर आणि G31x2 (700MHz) जीपीयू लावण्यात आला आहे.
  • सॉफ्टवेअर: गुगल टीव्ही, गुगल व्हॉईस असिस्टंट, किड्स प्रोफाईल, बिल्ट-इन क्रॉमकास्ट ची सुविधा दिली आहे.
  • इतर फिचर्स: एचडीआर 10, एएलएलएम, आय केअर मोड कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, ड्युअल बँड वाय-फाय सिस्टीम देण्यात आली आहे. 3 एचडीएमआय, 2 युएसबी 2.0, 1 ऑप्टिकल, एव्ही इन, इअरफोन आऊट, आरजे45 एलएएन आणि 20W चे 2 स्पीकर डॉल्बी ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे.
  • स्टोरेज: यात तुम्हाला 16GB स्टोरेजसह 2GB रॅमची शक्ती मिळत आहे.

सर्व टीव्हीचे सामान्य फिचर्स

सर्व बेझल-लेस डिस्प्लेसह डिझाईन केले गेले आहेत. यामध्ये गुगल व्हॉईस असिस्टंट, बिल्ट-इन गुगल क्रोमकास्ट असे अनेक पर्याय दिलेले आहेत. यातील एक खास वैशिष्टय़ म्हणजे लहान मुलांना लक्षात ठेवून बनवलेली किड्स प्रोफाईल सिस्टीम आहे. जी पॅरेंटल कंट्रोल्सनुसार कस्टमाईज्ड इंटरफेस प्रदान करते. वापरकर्ते गुगल प्ले स्टोअर द्वारे 14,000 हून अधिक ॲप्सचा वापर करू शकतात. नवीन टीव्ही श्रेणीमध्ये 178-डिग्री हॉरीजॉंटल व्हर्टिकल व्ह्यूईंग अँगल, उत्कृष्ट पिक्चर कॉलिटीसाठी एचडीआर 10 आणि स्मुथ गेमिंगसाठी एएलएलएम तंत्रज्ञान दिले गेले आहे. टीव्हीमधील आय केअर मोड दीर्घकाळ पाहत असताना डोळ्यांचा ताण कमी करतो. हे टीव्ही ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 ने सुसज्ज आहेत आणि सर्व मॉडेल्स गुगल टीव्ही 3.0 वर चालतात.

नवीन Daiwa स्मार्ट टीव्हीची किंमत

  • 32 इंचाच्या गुगल एचडी (32G1H) ची किंमत 10,999 रुपये आहे. तर 32 इंचाचा गुगल क्यूएलईडी (32G1Q) हा 11,499 रुपयांना येतो.
  • 43 इंचाच्या गुगल 4K (43G1U) ची किंमत 21,499 रुपये आणि 43 इंचाच्या गुगल 4K क्यूएलईडी (43G1Q) ची किंमत 21,999 रुपये आहे.
  • 55 इंचाचे गुगल 4K (55G1U) मॉडेल 33,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. तर 55 इंचाच्या गुगल 4K क्यूएलईडी (55G1Q) ची किंमत 34,990 रुपये आहे.
  • सर्व मॉडेल्स फ्लिपकार्टवर 1 वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध आहेत. यासोबतच तुम्हाला बँक ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here