5G Spectrum: 5जी मध्ये Jio सर्वात पुढे; पाण्यासारखे पैसे खर्च करून देखील स्वस्त इंटरनेट देणार?

5G Spectrum Auction India: 5G स्पेक्ट्रमचा लिलावाची काल सांगता झाली. 26 जुलैला सुरु झालेला हा लिलाव सात दिवस सुरु होता, ज्यात Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone Idea आणि Adani Group या चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तसेच लिलावात मुकेश अंबानी यांची कंपनी जियोनं सर्वाधिक बोली लावून आपणच टेलीकॉम सेक्टरचे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. चला जाणून घेऊया की कधीपर्यंत Jio 5G Network भारतात लाईव्ह होईल आणि जियो 5जी प्लॅन कसे असतील.

लावली सर्वाधिक बोली

5जी स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जियोनं पाण्यासारखे पैसे खर्च केले आहेत, त्यामुळे या लिलावात जियो सर्वाधिक पैसे खर्च करणारी कंपनी बनली आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकारच्या तिजोरीत एकूण 1,50,173 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. यातील जियोनं एकूण 88,078 कोटी रुपयांचं स्पेक्ट्रम विकत घेतलं आहे. म्हणजे या लिलावातील 58.65 टक्के रक्कम फक्त एकट्या रिलायन्सच्या खिशातून येईल. जियोनं 700MHz बँड देखील विकत घेतला आहे. जो 5जीसाठी सर्वात बेस्ट असल्याची चर्चा आहे. हा बँड जियोनं सर्व 22 सर्कल्समध्ये विकत घेतला आहे.

रिलायन्स जियो इंफोकॉमचे चेयरमन आकाश एम अंबानींनी म्हणाले की, “आम्हाला नेहमीच वाटते की नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करून भारत जागतिक एक प्रमुख आर्थिक शक्ती बनेल. याच दृष्टी आणि विश्वासामुळे जियोचा जन्म झाला. जियोच्या 4G रोलआउटचा वेग, व्याप्ती आणि समाजावरील प्रभाव जगभरात अतुलनीय आहे. आणि आता भारतात जियो 5G टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

जियोनं विकत घेतलेले बँड्स

5जी स्पेक्ट्रम लिलावात एकूण 72097.85 MHz spectrum चा लिलाव झाला. या कंपनीनं 700 MHz, 800 MHz, 1800 MHz, 3300 MHz मिड फ्रीक्वेंसी बँड्स तसेच 26 GHz High frequency band मिळवला आहे. विशेष म्हणजे रिलायन्स जियोनं यातील अनेक बँड्सवर आपली 5जी टेस्टिंग व ट्रायल पूर्ण केले आहेत.

जियो देणार किफायतशीर 5G सर्व्हिस

आम्ही संपूर्ण भारतात 5जी रोलआउटसह ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करू. जियो जागतिक दर्जाची, किफायतशीर 5G सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही अशी सेवा, प्लॅटफॉर्म आणि समाधान देऊ जे भारताच्या डिजिटल क्रांतीला गती देतील. खासकरून शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स सारख्या महत्वाच्या क्षेत्रात माननीय पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया मिशनला साकार करण्यात आमचं आगामी योगदान असेल.”

कधी सुरु होईल Jio 5G

लिलाव 20 वर्षांसाठी झाला आहे, ज्यात Jio नं मिळवलेल्या स्पेक्ट्रमवर कंपनी आपली 5G service सुरु करेल. चर्चा आहे की स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यावर 15 ऑगस्टला भारत सरकार 5जी सेवा देशात सुरु करू शकतं आणि असे झाल्यास रिलायन्स जियोचे ग्राहक देशात सर्वप्रथम 5जी नेटवर्क असलेले मोबाईल युजर बनू शकतात. परंतु फोनमध्ये 5जी नेटवर्क येण्यास 2-3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

किती फास्ट असेल Jio 5G?

रिलायन्स जियोच्या सरकारी आकडे पाहता, दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की आगामी 5जी सध्याच्या 4जीपेक्षा 10 पाट जास्त फास्ट असेल. मंत्रालयानुसार, 5G Network वर 20Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळू शकतो. तसेच Reliance Jio च्या 5जी ट्रायल्स पाहता, Jio 5G ची 1Gbps स्पीडवर नेटवर्क टेस्टिंग करण्यात आली आहे. वास्तवात रिलायन्स जियो नेटवर्कवर 420Mbps download speed तसेच 412Mbps upload speed मिळण्याची शक्यता आहे, ज्यात 11ms latency म्हणजे फक्त 11 मायक्रोसेकेंडची लेटेंसी मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here