अर्धी कमाई पाठवली चीनला; Vivo च्या टॅक्स चोरीवर ED ची मोठी कारवाई

चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo शी संबंधित 48 ठिकांणांवर Enforcement Directorate म्हणजे अंमलबजावणी संचालनालयानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. आता कंपनीचे 119 बँक अकाऊंट्स केंद्रीय तपास यंत्रणेने ब्लॉक केले आहेत. Vivo India नं टॅक्स चोरी करून चीनसह अन्य देशांमध्ये 62,476 कोटी रुपये पाठवल्यामुळे ED नं मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी ED नं सांगितलं की मनी लॉन्ड्रिंगच्या तपासासाठी विवो इंडियाचे 119 बँक अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच 48 ठिकाणी Vivo आणि तिच्या सहाय्यक 23 कंपन्यांवर धाड टाकण्यात आली आहे. विवोवर भारतात तोटा दाखवून विदेशांमध्ये टॅक्स चोरी करून पैसे पाठवण्याचा आरोप आहे.

BBK Electronics च्या मालकीची चीनी कंपनी Vivo नं मात्र अजूनही बँक अकाऊंट ब्लॉक करण्याबाबत कोणतंही स्टेटमेंट जारी केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी ED नं विवो आणि तिच्या सहायक कंपन्यांच्या 48 ठिकाणांवर छापे टाकले होते आणि त्यानंतर कंपनीनं म्हटलं होतं की भारतातील नियमांतर्गत तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य दिलं जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये कंपनीच्या कर्मचारी केंद्रीय तपास यंत्रणेला मदत न केल्याची माहिती दिली आहे.

अर्धी कमाई चीनला पाठवण्याचा आरोप

ED नं आपल्या विधानात म्हटलं आहे की, Vivo India नं आपल्या एकूण सेल्स 1,25185 कोटी रुपयांपैकी जवळपास 50 टक्के म्हणजे 62,476 कोटी रुपये चीनला पाठवले आहेत. टॅक्स चोरी (tax evasion) करता यावी म्हणजे इथे तोटा दाखवण्यात आला, असं तपासातून समोर आलं आहे. अंमलबजावणी संचालनालय फेब्रुवारी 2022 पासून विवोच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे.

विवोच्या ब्लॉक केलेल्या 119 बँक अकाऊंट्समध्ये सध्या 465 कोटी रुपयांचा ग्रॉस बॅलेन्स शिल्लक आहे, ज्यात एफडीसह विवो इंडियाचे 66 कोटी रुपये, 2 किलो गोल्ड बार आणि जवळपास 73 लाख रुपये कॅश अमाउंटचा समावेश आहे. कंपनीची ही उर्वरित रक्कम PMLA (Prevention of Money Laundering Act) 2002 अंतगर्त कारवाई करत जप्त करण्यात आली आहे.

आधी झालेली कारवाई

मेमध्ये देखील Vivo आणि ZTE च्या अनेक भारतीय यूनिट्सचा कॉर्पोरेट अफेयर्स मिनिस्ट्रीद्वारे तपास करण्यात आला होता. सेंट्रल एजेंसीला विवो आणि ZTE द्वारे सुरु असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची माहिती मिळाली होती, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सनं या कंपन्यांच्या भारतीय यूनिट्सचा तपास केला होता. Vivo India कडून तेव्हा कॉर्पोरेट मंत्रालयानं कंपनीच्या डायरेक्टर्स, शेयरहोल्डर्स, बेनिफिशिरी आणि ओनर्सची माहिती मागवली होती.

याआधी देखील अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED नं चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi कडून आर्थिक गैरव्यवहारामुळे 5551 कोटी रुपये जप्त केले होते. Xiaomi व्यतिरिक्त केंद्र सरकारनं 2020 पासून आतापर्यंत 500 पेक्षा जास्त चीनी कंपन्यांच्या अकाऊंट्सची तपासणी केली आहे. यात ZTE, Vivo, OPPO, Huawei Technologies, Alibaba Group या कंपन्यांच्या अनेक भारतीय यूनिट्सचा समावेश आहे.

Published by
Siddhesh Jadhav
Tags: Vivo