Vivo S19, S19 Pro फोनची लाँचची तारीख ब्रँडने केली कंफर्म, चीनमध्ये या दिवशी होईल एंट्री

विवोच्या एस 19 सीरिज बाजारात येण्यासाठी तयार आहे. यात Vivo S19 आणि Vivo S19 Pro स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये लाँच केले जातील. तसेच अनेक दिवसांपासून डिव्हाईसचे लीक आणि सर्टिफिकेशन वेबसाईटवर समोर आले आहेत. आता ब्रँड द्वारे सादर होण्याच्या तारखेची घोषणा झाली आहे. चला, पुढे लाँचची तारीख, वेळ आणि संभावित स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Vivo S19 आणि Vivo S19 Pro लाँचची तारीख

  • कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर डिव्हाईसची मायक्रोसाईट लाइव्ह करण्यात आली आहे. ज्यात Vivo S19 आणि Vivo S19 Pro स्मार्टफोनची लाँचची तारीख 30 मे दिसत आहे.
  • जर फोनच्या सादर होण्याच्या वेळेबद्दल बोलेले तर हा 30 मे ला चीनच्या लोकल वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता लाँच केला जाईल.
  • कंपनीनं टिझरमध्ये मोबाईलचे स्पेसिफिकेशन आणि लूकला पण दाखविले आहे.
  • डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर सॉफ्ट रिंग लाईट फिचर आणि ऑरा लाईट OIS पोर्ट्रेट टेक्नॉलॉजी पण मिळेल.
  • वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार सीरिजचा एस 19 मॉडेल 6000mAh ची मोठी बॅटरीसह असेल. तसेच दोन्ही मॉडेलला तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाईल.

Vivo S19 आणि S19 Pro चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: vivo S19 आणि S19 Pro फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 2800×1260 पिक्सल रिजॉल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: Vivo S19 Pro मध्ये 3.35GHz क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर Dimensity 9200+ 4 नॅनोमीटर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर इम्मोर्टलिस-G715 GPU मिळण्याची शक्यता आहे. Vivo S19 पाहता यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 4nm चिपसेट आणि एड्रेनो 720 GPU लावला जाऊ शकतो.
  • S19 Pro कॅमेरा: प्रो मॉडेलमध्ये 1/1.56 Sony IMX921 सेन्सर, OIS, ऑरा लाइट LED फ्लॅशसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा Sony IMX816 अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 50MP टेलीफोटो पोर्ट्रेट कॅमेरा 50x पर्यंत डिजिटल झूमसह मिळू शकतो.
  • S19 कॅमेरा: Vivo S19 मध्ये 1/1.56 सॅमसंग GNJ सेन्सर, OIS, ऑरा लाईट LED फ्लॅशसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाईड सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • फ्रंट कॅमेरा: vivo S19 आणि S19 Pro मोबाईलमध्ये 50MP ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा मिळण्याची चर्चा आहे.
  • बॅटरी: vivo S19 मध्ये 6000mAh बॅटरी मिळण्याची गोष्ट कंफर्म झाली आहे. तर vivo S19 Pro मध्ये 5500mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग असू शकते.
  • इतर: फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, हाई-रेज ऑडियो, 5 जी 4 जी वीओएलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4 सारखे फिचर्स मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here