108MP Back आणि 32MP Selfie Camera सह लाँच झाला हा 5G Phone, मिळत आहे 12GB RAM

Infinix Note 40 5G फोन जागतिक मार्केटमध्ये लाँच झाला आहे. कंपनीने एप्रिल महिन्यामध्ये या सीरिज Infinix Note 40 Pro 5G आणि Note 40 Pro+ 5G फोन भारतात लाँच केले होते तसेच 4G मॉडेल Infinix Note 40, Note 40 Pro पहिलेच जागतिक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पुढे तुम्ही इनफिनिक्स नोट 40 सीरिजच्या या पाचव्या सदस्यची संपूर्ण माहिती वाचू शकता.

Infinix Note 40 5G ची किंमत

​इनफिनिक्स नोट 40 5 जी फोन फिलिपिंसमध्ये लाँच झाला आहे. मोबाईलच्या 12GB RAM + 512GB Storage व्हेरिएंटची किंमत PHP 13999 सांगण्यात आली आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 20,000 रुपयांच्या आसपास आहे. फिलिपिंसमध्ये हा मोबाईल Black, Gold आणि Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. सध्या फोनच्या भारतातील लाँचबद्दल काहीपण ठामपणे सांगता येणार नाही.

Infinix Note 40 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.78″ 120 हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • मीडियाटेक ​डायमेंसिटी 7020
  • 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 108 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
  • 33 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

स्क्रीन : Infinix Note 40 5G फोन 1080 x 2436 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही स्क्रीन AMOLED पॅनलवर बनली आहे जी 120Hz रिफ्रेश रेट, 1300 निट्स ब्राईटनेस तसेच 2160Hz पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट करते.

प्रोसेसर : हा मोबाईल अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो एक्सओएस 14 सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7020 8-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 108MP मेन कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो OIS टेक्नॉलॉजीवर चालतो. त्याचबरोबर रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची दोन इतर लेन्स पण आहे.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी Infinix Note 40 5G फोन 32MP Selfie Camera ला सपोर्ट करतो. हा एफ/2.2 अपर्चरवर काम करणारी लेन्स आहे ज्यासोबत फ्रंट ड्युअल फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी ​इनफिनिक्स नोट 40 5 जी फोन 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा फोन 15 वॉट वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

इतर फिचर्स : हा इनफिनिक्स फोन JBL ड्युअल स्टीरियो स्पिकर्सला सपोर्ट करतो. यात ब्लूटूथ आणि वायफाय सोबतच NFC व OTG सारखे पर्याय पण मिळतात. फोन IP53 सर्टिफाईड आहे जो याला पाणी व धूळीपासून वाचवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here