10000mAh बॅटरी, 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिप असलेला Redmi Pad Pro जागितिक स्तरावर लाँच, जाणून घ्या किंमत

गेल्या महिन्यात चीनमध्ये सादर झाल्यानंतर Redmi Pad Pro जागतिक मार्केटमध्ये पण लाँच झाला आहे. हा मिड बजेटमध्ये युजर्सना हलकी आणि पातळ डिझाईन तसेच पावरफुल स्पेक्स देतो. यात 10000mAh ची मोठी बॅटरी, 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, 12.1 इंचाचा मोठा डिस्प्ले सारखे अनेक फिचर्स आहेत. चला, पुढे याची जागतिक किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Redmi Pad Pro चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: रेडमी पॅड प्रो मध्ये 12.1 इंचाचा मोठा एलसीडी डिस्प्ले आहे, जो 249 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 2560 x 1600 पिक्सल रिजॉल्यूशन, 83.6% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट 1500:1 चा कंट्रास्ट रेश्यो 600 निट्स पीक ब्राईटनेस आणि डॉल्बी व्हिजन टेक्नॉलॉजी काला सपोर्ट करतो. यात सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे.
  • चिपसेट: Redmi Pad Pro टॅबलेटमध्ये परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस Gen 2 प्रोसेसर आहे. ज्याची अधिकतम क्लॉक स्पीड 2.4GHz समोर आली आहे.
  • स्टोरेज: नवीन टॅबलेट दोन मेमरी व्हेरिएंट मध्ये येतो. ज्यात 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज आहे. हेच नाही तर स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढविले पण जाऊ शकते.
  • कॅमेरा: टॅबलेटच्या समोर आणि बॅक पॅनलवर ग्राहकांना 8MP ची कॅमेरा लेन्स मिळेल.
  • बॅटरी: रेडमीच्या नवीन टॅबलेटमध्ये 10,000mAh ची मोठी बॅटरी आहे जो जास्त वेळाचा बॅकअप देते. याला चार्ज करण्यासाठी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • इतर: Redmi Pad Pro मध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि ड्युअल मायक्रोफोनसह क्वॉड-स्पिकर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टॅबलेट वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 आणि 3.5 मिमी ऑडियो जॅकसह आहे.
  • ओएस: सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा टॅब अँड्रॉईड 14 आधारित हायपरओएसवर चालतो.

Redmi Pad Pro ची किंमत

  • Redmi Pad Pro टॅबलेटला दोन स्टोरेज पर्यायामध्ये जागतिक वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले आहे. हा अर्ली बर्ड ऑफरसह बुकिंग आणि खरेदीसाठी उपलब्ध आहे.
  • टॅबलेटच्या बेस मॉडेल 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेजची किंमत £269.00 म्हणजे जवळपास 28,500 रुपये आहे.
  • टॉप मॉडेल 8 जीबी रॅम+256 जीबी स्टोरेज £349.90 म्हणजे भारतीय किंमतीनुसार जवळपास 37,000 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here