Home टिप्स अँड ट्रिक्स PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार

PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार

पीडीएफ फाइल्स (PDF Files) च्या माध्यमातून कोणतीही माहिती शेयर करणं सोपं आहे. परंतु या फाइल्स बाबत एक गोष्ट जास्त खटकते ती म्हणजे काही चूक असल्यास किंवा बदल करायचे असल्यास एडिट करण्याचा पर्याय सहज मिळत नाही. जर पीडीएफ फाइल एडिट करण्यासाठी तुम्ही अडोबी अ‍ॅक्रोबेट डीसी (Adobe Acrobat DC) वर पैसे खर्च करू इच्छित नसाल तर तुम्ही काही फ्री टूल्सच्या मदतीनं देखील हे काम करू शकता. इथे सहज पीडीएफ फाइल्स (PDF Files) एडिट आणि मर्ज करता येतात.

PDF Files एडिट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप

पीडीएफ फाइल्स एडिट करण्यासाठी कोणतंही सॉफ्टवेयर डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन देखील हे काम सहज करू शकता.

  • यासाठी https://www.pdfescape.com साइटची मदत घेता येईल. इथे तुम्हाला ज्या पीडीएफ फाइल्स एडिट करायच्या असतील त्या ड्रॅग अँड ड्रॉपच्या माध्यमातून किंवा फाइल सिलेक्ट करून अपलोड करू शकता.
  • काही सेकंदांच्या प्रॉसेसिंगनंतर फाइल (Files) एडिटसाठी उपलब्ध होईल. इथे डावीकडील पॅनलवर तुम्हाला एडिटिंग संबंधित टूल्स मिळतील, ज्यांच्या मदतीनं पीडीएफ फाइल्ससह टेक्स्ट (Text) जोडणे सोपं होईल. तसेच इथे तुम्हाला खाली व्हाइट बॉक्स देखील मिळेल, ज्याच्या मदतीनं पीडीएफ फाइल्सवर गोष्टी लपवता येतील. तुम्ही पीडीएफ फाइल्ससह कमेंट्स देखील जोडू शकता.
  • एकदा एडिटिंग पूर्ण झाली की पुन्हा सेव्ह अँड डाउनलोड (Save And Download) बटनवर क्लिक करा. फाइल तुमच्या डिवाइसवर लोकली सेव्ह (Local save) देखील करता येईल.
  • PDF Files अशा करा मर्ज

    वेगवेगळ्या PDF Files एकत्र मर्ज करणे देखील सोपं आहे.

  • सर्वप्रथम https://smallpdf.com साइट ओपन करा.
  • ही फ्री आणि प्रो व्हर्जनसह येते.
  • या साइटवर पीडीएफ फाइल्स (PDF Files) अपलोड करून मर्ज करता येतात.
  • जर तुमच्याकडे बऱ्याच पीडीएफ फाइल्स असतील आणि सर्व फाइल्स एकत्र मर्ज करायच्या असतील तर ते देखील ही वेबसाइट करू शकते.
  • इथे तुम्हाला पीडीएफ फाइल कंवर्ट करण्याची सुविधा देखील मिळते.