Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत

तुम्ही इन्स्टाग्रामवर रील (Instagram reel) बनवता परंतु ती फेसबुक (Facebook) वर कशी शेयर करायची? गोंधळून जाऊ नका, पद्धत सोपी आहे. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर केल्यामुळे फक्त प्रेक्षकवर्ग वाढत नाही तर फॉलोअर्स देखील वाढू शकतात. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याची माहिती पुढे वाचू शकता.

इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर करण्याची पद्धत

फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याआधी तुमचं Instagram आणि Facebook अकाऊंट एकमेकांशी जोडलेलं असावं. Instagram आणि Facebook अकाऊंट लिंक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

 • इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फेसबुक जोडण्यासाठी तुम्हाला अकाऊंट सेंटर (Accounts Centre) मध्ये जावं लागेल.
 • यासाठी आधी प्रोफाईल मध्ये जाऊन खाली उजवीकडे प्रोफाईल किंवा अपना प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.
 • त्यानंतर उजवीकडे वर तीन लाइन असेलल्या hamburger मेन्यूवर टॅप करा, नंतर ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ मध्ये जा.
 • यहां ‘अकाऊंट सेंटर’ टॅप करा.
 • ‘अ‍ॅड फेसबुक अकाऊंट’ च्या ऑप्शनवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करून इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुकला जोडा.

अशी शेयर करा इन्स्टाग्राम रील

 • सर्वप्रथम डावीकडे ‘क्रिएट’ वर क्लिक करून रील रेकॉर्ड करण्यास सुरुवात करा.
 • त्यानंतर तुमची रील शेयर करण्याआधी ‘शेयर टू फेसबुक’ वर क्लिक करा.
 • तुम्ही ज्या फेसबुक अकाऊंटशी रील शेयर करू इच्छित असाल त्याच्या स्विच बटनवर टॅप करा.
 • इथून भविष्यातील सर्व रील फेसबुकवर शेयर करायच्या आहेत की फक्त चालू, ते निवडा.
 • वर डावीकडे> वर टॅप करा, आणि ‘शेयर’ वर टॅप करा.

ऑटोमॅटिक फेसबुकवर शेयर करा रील

जर तुम्हाला इन्स्टाग्रामवरील सर्व रील ऑटोमॅटिकपद्धतीनं फेसबुकवर शेयर करायची असेल तर पुढील स्टेप को फॉलो करा:

 • तुमच्या प्रोफाईलवर जाण्यासाठी उजवीकडे प्रोफाईल किंवा प्रोफाईल पिक्चर वर क्लिक करा.
 • सर्वात वर उजवीकडे hamburger मेन्यू वर क्लिक करा आणि ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ सेक्शन मध्ये जा.
 • इथे तुम्हाला अकाऊंट सेंटरमध्ये गेल्यानंतर Sharing across profiles ऑप्शनवर टॅप करा.
 • आता तुमचं ते अकाऊंट सिलेक्ट करा, ज्याच्या माध्यमातून रील्स शेअर करायच्या आहेत किंवा ते अकाऊंट देखील सिलेक्ट करा, ज्यावर रील शेयर करायच्या आहेत.
 • त्यानंतर खाली ‘ऑटोमॅटिकली शेयर’ समोरील स्विच बटनवर टॅप करा. त्यानंतर इन्स्टाग्रामवर जी रील तुम्ही शेयर कराल ती आपोआप फेसबुकवर देखील शेयर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here