Home बातम्या विवो घेऊन येत आहे आणखी एक स्वस्त मोबाइल फोन Vivo Y02t; भारतीय सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट

विवो घेऊन येत आहे आणखी एक स्वस्त मोबाइल फोन Vivo Y02t; भारतीय सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट

Highlights
  • ह्यात MediaTek Helio प्रोसेसर मिळू शकतो.
  • फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते.
  • Vivo Y02t मध्ये 6.5″ FHD+ स्क्रीन असू शकते.

दहा हजारांच्या आत विवो कंपनीनं Vivo Y02 स्मार्टफोन लाँच केला आहे ज्याची किंमत फक्त 8,999 रुपये आहे. आता बातमी आली आहे की हा चीनी ब्रँड आपल्या ह्या मोबाइलच्या आणखीन एका व्हर्जनवर काम करत आहे जो Vivo Y02t नावानं लाँच होईल. हा स्मार्टफोन Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे, ज्यामुळे स्पष्ट झालं आहे की विवो वाय02टी लवकरच भारतात लाँच होऊ शकतो.

विवो वाय02टी बीआयएस लिस्टिंग

हे देखील वाचा: BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून

विवो वाय02टी स्पेसिफिकेशन्स (लीक)

समोर आलेल्या लीक्सनुसार हा मोबाइल फोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हे स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच फोनचे बजेट पाहता असं म्हणता येईल की Vivo Y02T मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकतो.

Vivo Y02t मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु ह्या चिपसेटचं कोडनेम समोर आलं नाही. हीलियो चिपसेटवरून स्पष्ट झालं आहे की वाय02टी एक 4जी फोन असेल. या फोनमध्ये 2जीबी रॅम किंवा जास्तीत जास्त 4जीबी रॅम दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 64MP Camera आणि 8GB Extended RAM टेक्नॉलॉजीसह Infinix Note 30i आला समोर

फोटोग्राफीसाठी विवो वाय02टी मध्ये 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सर असेल, असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये 6 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.