64MP Camera आणि 8GB Extended RAM टेक्नॉलॉजीसह Infinix Note 30i आला समोर

Highlights

  • हा फोन IP53 सर्टिफाइड आहे.
  • ह्यात ड्युअल JBL स्पिकर देण्यात आले आहेत.
  • फोन Extended RAM फीचरसह येतो.

इनफिनिक्स ‘नोट’ सीरीजचा अजून एक नवीन मोबाइल समोर आला आहे. हा स्मार्टफोन Infinix Note 30i नावानं कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑफिशियल झाला आहे ज्याच्या लुक, डिजाईन, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. सध्या इनफिनिक्स नोट 30आयची किंमत येणं बाकी आहे परंतु त्याआधी फोनची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

इनफिनिक्स नोट 30आय फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.66″ FHD+ Display
  • AMOLED Panel

इनफिनिक्स नोट 30आय स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. ह्या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92 टक्के आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत व खाली बारीक चिन पार्ट आहे. हे देखील वाचा: व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक

  • 8GB Extended RAM
  • MediaTek Helio G85

Infinix Note 30i स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस 13 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो फोनची इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून हा 16जीबी रॅमची ताकद देतो.

  • 64MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स नोट 30आय स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो इतर दोन लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत

  • 33W Fast Charge
  • 5,000mAh Battery

पावर बॅकअपसाठी ह्या इननिफिक्स फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी Intelligent Power E-IQ टेक्नॉलॉजीसह येते. ह्या फोनसह रिवर्स चार्जिंग देखील मिळते. तर मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here