BSNL नं लाँच केले नवीन Cinemaplus OTT Entertainment Packs, किंमत सुरु होते 49 रुपयांपासून

Highlights

  • बीएसएनएलनं तीन नवीन पॅक्स सादर केले आहेत.
  • बीएसएनएल प्लॅन्समध्ये अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा फायदा मिळेल.
  • या प्लॅनची किंमत तुमच्या बिलमध्ये जोडली जाईल.

ओटीटी वापरणाऱ्या युजर्सची वाढती संख्या पाहून BSNL नं तीन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन्स कंपनीनं Cinemaplus OTT Entertainment Packs नावानं सादर केले आहेत. ह्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनीनं Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारख्या ओटीटी साइट्सशी भागेदारी केली आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सबाबत संपूर्ण माहिती.

बीएसएनएल न्यू ओटीटी पॅक्सची किंमत

  • BSNL Cinemaplus 49 रुपयांचा प्लॅन
  • BSNL Cinemaplus 199 रुपयांचा प्लॅन
  • BSNL Cinemaplus 249 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएल सिनेमाप्लस स्टार्टर पॅक: स्टार्टर पॅक सध्या 49 रुपयांमध्ये (मूळ किंमत 99 रुपये) डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यात शेमारू, हंगामा, लायन्सगेट आणि एपिक ऑनच्या ओटीटी सेवेचा समावेश करण्यात आला आहे.

बीएसएनएल सिनेमाप्लस फुल पॅक: 199 रुपयांची किंमत असलेला हा फुल पॅक ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV आणि Hotstar सह येतो.

बीएसएनएल सिनेमाप्लस प्रीमियम पॅक: 249 रुपयांमध्ये हा प्रीमियम पॅक उपलब्ध आहे, ज्यात ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate आणि Hotstar चा कंटेंट मिळतो.

वर सांगितल्याप्रमाणे बीएसएनएल तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी कंटेंट प्रोव्हायडर कॉम्बिनेशनसह तीन पॅक ऑफर करत आहे. निवडलेल्या पॅकच्या आधारावर सर्व ओटीटीसाठी सब्सस्क्रिप्शन तुमच्या फायबर कनेक्शनच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर अ‍ॅक्टिव्ह होईल. प्लॅनची किंमत तुमच्या बिल मध्ये जोडली जाईल.

एकंदरीत पाहता बीएसएनएल सिनेमाप्लस तुमच्या सर्व मनोरंजनाच्या गरजांसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. जर तुम्ही ओटीटीसाठी वेगळं सब्सक्रिप्शन घेत असला तर हे पॅक्स तुमच्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतात.

बीएसएनएलचा 799 रुपयांच्या प्लॅन

या प्लॅनमध्ये 24 तास कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. बीएसएनएलच्या ह्या प्लॅनमध्ये 100Mbps स्पीडनं अनलिमिटेड इंटरनेट मिळतं. तसेच ह्यात 1000GB डेटा मिळतो. डेटा संपल्यावर स्पीड 5Mbps होतो. ह्या प्लॅनमध्ये Hotstar Super, Lions Gate, Shemaroo, Hungama, SonyLIV, Zee5, Voot आणि YuppTV चं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here