Categories: बातम्या

आज पासून सुरु झाली वनप्लस 6टी ची विक्री, बघा याची पहिली झलक आणि जाणून घ्या या फोन संबंधित काही प्रश्नांची उत्तरे

फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनप्लस ने दिवाळीच्या निमित्ताने भारतात आपला नवीन हँडसेट वनप्लस 6टी सादर केला आहे. हा फोन आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया व्यतिरिक्त आॅफलाइन स्टोर रिलायंस डिजिटल आणि क्रोमा वर सेल साठी उपलब्ध आहे. स्टाइल पासून फीचर पर्यंत अनेक बाबतीत हा फोन खास आहे. जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असला तर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. खाली आम्ही वनप्लस 6टी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

वनप्लस 6टी ची डिजाइन कशी आहे?

वनप्लस 6टी ची बॉडी मेटल फ्रेम वर बनलेली आहे पण मागील पॅनल मध्ये ग्लास देण्यात आली आहे जी खूप चमकदार आहे. याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि कोपरे खूप कर्व्ड आहेत आणि स्लिक आहेत. त्यामुळे पकडल्यावर हा खूप आरामदायक वाटतो.

फोनचा डिस्प्ले कसा आहे?

वनप्लस 6टी मध्ये 6.41-इंचाचा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाला फुल व्यू डिस्प्ले आहे. कंपनी ने हा 1080 x 2280 पिक्सल रेजल्यूशन वाली फुल एचडी+ डिस्प्ले सह सादर केला आहे. त्याचबरोबर एमोलेड स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे जो वायब्रेंट डिस्प्ले साठी ओळखला जातो. फोनचा डिस्प्ले खूप चांगला आहे.

स्क्रीन प्रोटेक्शन आहे का?

वनप्लस 6टी ची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 कोटेड आहे. हा कोर्निंगचा लेटेस्ट वर्जन आहे जो खूप अडवांस आहे. कोर्निंग प्रोटेक्शन स्क्रीनला फक्त छोट्या स्क्रॅच पासून वाचवत नाही तर याला मजबूती पण देतो.

यात नॉच आहे का?

नॉचची सुरवात कंपनी ने वनप्लस 6 पासून केली होती. तर वनप्लस 6टी मध्ये अगदी छोटी नॉच आहे. हि एयरड्रॉप नॉच म्हणून ओळखली जाते. या गोलाकार नॉच वर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनचा फिंगरप्रिंट स्कॅनर कसा आहे?

वनप्लस 6टी च्या मागच्या पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला नाही. कंपनी ने या फोन मध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. अर्थात स्क्रीनच्या खाली स्कॅनर आहे. बोट लावताच स्क्रीन अनलॉक होते. कंपनीचा दावा आहे कि हा फक्त 0.3 सेकेंड मध्ये स्क्रीन अनलॉक करतो. आम्हला हा खूप फास्ट वाटला. फोन मध्ये लिफ्ट टू वेक आॅप्शन पण आहे ज्यामुळे फोन उचलताच फिंगरप्रिंट स्कॅनर चालू होतो आणि तुम्ही पावर बटन ना दाबता स्क्रीन अनलॉक करू शकता.

फोनचा प्रोसेसर कसा आहे

वनप्लस 6टी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर सादर करण्यात आला आहे आणि यात (4×2.8 गीगाहट्र्ज क्रयो 385 गोल्ड + 4×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 385 सिल्वर) आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तर चांगल्या ग्राफिक्स साठी कंपनी ने यात एड्रीनो 630 जीपीयू दिला आहे. क्वालकॉम चा हा सध्यातरी सर्वात ताकदवान चिपसेट आहे जो बेस्ट परफॉर्मेंस साठी ओळखला जातो.

वनप्लस 6टी मध्येकिती रॅम आहे?

हा फोन 6जीबी आणि 8जीबी की रॅम सह येतो.

याची इनबिल्ट मेमरी किती आहे?

वनप्लस 6टी तीन मेमरी ऑप्शन्स मध्ये येतो. 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी, 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी.

मेमरी एक्सपांडेबल आहे का?
नाही! वनप्लस च्या डिवाइस मध्ये मेमरी एक्सपांड करता येत नाही. या फोन मध्ये पण मेमरी कार्ड सपोर्ट नाही.

फोन कोणत्या आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो?

वनप्लस 6टी आॅक्सिजन ओएस 9.0 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे. हा अगदी स्टॉक ओएस सारखा वाटतो. विशेष म्हणेज कंपनी ने पुढील दोन वर्षांचे अपडेट देण्याचा विश्वास दिला.

फोनचा रियर कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे आणि यात कोणते फीचर्स आहेत?

वनप्लस 6टी मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागच्या पॅनल मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सलचा सेंकेंडरी कॅमेरा सेंसर मिळेल. दोन्ही सेंसर एफ/1.7 अपर्चर सह येतात. तसेच कंपनी ने इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन सोबत आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन पण दिले आहे ज्यामुळे कॅमेरा अस्थिर असला तरी चांगले फोटो घेऊ शकतो.

फोटोग्राफी साठी बोके इफेक्ट, पॅनारॉमा मोड आणि एचडीआर सारखे आॅप्शन देण्यात आले आहेत. तसेच तुम्ही प्रो मोड पण वापरू शकता.

4के आणि स्लो मोशन वीडियो रेकॉर्डिंग आहे का?

वीडियो साठी 4के रेकॉर्डिंग 60 फ्रेम प्रति सेकेंड ने करता येते जी खूप चांगली बाब आहे. तसेच यात स्लो मोशन वीडियो रेकॉर्डचा ऑप्शन पण आहे.

वनप्लस 6टी चा सेल्फी कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे?

वनप्लस 6टी मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच यात जायरो ईआईएस आणि आॅटो एचडीआर आहे. सेल्फी कॅमेरा सोबत पण बोके इफेक्ट देण्यात आला आहे.

वनप्लस 6टी मध्ये कनेक्टिविटी चे कोणते आॅप्शन आहेत?

वनप्लस 6टी मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही स्लॉट मध्ये तुम्ही 4जी वोएलटीई सिम वापरू शकता. तसेच वाईफाई, ब्लूटूथ आणि एनएफसी देण्यात आले आहेत. फोन मध्ये चार्जिंग, डेटा ट्रांस्फर आणि ईयरफोन साठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. यात 3.5 एमएम जॅक नाही.

3.5 एमएम आॅडियो जॅक नाही मग इयरफोनचा वापर कसा करावा?

कंपनी ने यूएसबी टाइप-सी वाले ईयरफोन दिले आहेत. तुम्ही ते कनेक्ट करू शकता किंवा बाजारात कनेक्टर उपलब्ध आहेत. पण टाइप सी वाल्या बुलेट ईयरफोन साठी तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतील.

वनप्लस 6टी मध्ये किती एमएएच बॅटरी आहे?

या फोन मध्ये 3,700 एमएएच बॅटरी आहे. जी जुन्या फोनच्या तुलनेत जवळपास 400 एमएएच जास्त आहे.

यात फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे का?

वनप्लस 6टी सोबत डॅश चार्जर देण्यात आला आहे जो फास्ट चार्जला सर्पोट करतो. जो जवळपास एका तासात पूर्णपणे चार्ज होतो.

वनप्लस 6टी ची किंमत किती आहे?

वनप्लस 6टी चा 6जीबी रॅम व 128जीबी वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

याच्यासोबत आॅफर आहे का?

कंपनी ने जियो सोबत मिळून 5,000 रुपयांची आॅफर दिली आहे ज्यात तुम्ही 3टीबी डेटा बेनिफिट मिळवू शकता.

Published by
Siddhesh Jadhav