200MP Back कॅमेरा, 50MP Selfie कॅमेरा आणि 15,600mAh बॅटरी! या फोनने बाजार हादरला

रगेड फोन म्हणजे असा मोबाईल जो खूप मजबूत बिल्ड क्वॉलिटीवर बनलेला आहे, तसेच तीव्र उष्णता आणि थंडी तसेच पडणे किंवा पडल्यामुळे झालेल्या दुखापतींचा सहज सामना करू शकतो. तसेच हा स्मार्टफोन बनविण्यासाठी फेमस कंपनी Ulefone ने अजून एक नवीन डिव्हाईस Armor 26 Ultra चीनमध्ये लाँच केला आहे. हा मोबाईन फक्त military grade सर्टिफिकेशन सह आला आहे, तसेच यात फिचर्स आणि स्पेसिफिकेशन पण खूप दमदार देण्यात आले आहेत.

Rugged Phone

Ulefone Armor 26 Ultra MIL-STD-810H Certification सह सादर करण्यात आला आहे जो याला खूप मजबूत व टफ बॉडी असलेला स्मार्टफोन बनवितो. हा फोन IP68 आणि IP69K रेटिंगसह आला आहे जो याला वॉटरप्रूफ व ​डस्टप्रूफ बनवतो. कंपनीनुसार हा मोबाईल 30 मिनिटापर्यंत 2 ​मीटर पाण्यामध्ये ठेवला जाऊ शकतो, तसचे 1.5 मीटरच्या ऊंचीवरून पडल्यावर पण सुरक्षित राहतो. तसेच फोनची डस्टप्रूफिंग याला माती व धूळीपासून वाचवते. या मोबाईलमध्ये 121dB स्पिकर पण आहे जो अतिशय मजबूत आवाज देतो.

Ulefone Armor 26 Ultra चे स्पेसिफिकेशन

  • 15,600 एमएएचची बॅटरी
  • 120 वॉट फास्ट चार्जिंग
  • 50 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 200 एमपी क्वॉड रिअर कॅमेरा
  • मीडियाटेक डाईमेंसिटी 8020
  • 6.78″ 120 हर्ट्झ डिस्प्ले

बॅटरी

यूलेफोन आर्मर 26 अल्ट्रा स्मार्टफोनला 15,600mAh Battery सह बनविण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की फुल चार्जमध्ये हा फोन 1750 तासाचा स्टॅन्ड बाय टाईम देऊ शकतो. तसेच याला फक्त 5 मिनिट चार्ज करून 9 दिवसाचा स्टॅन्ड बाय मिळवला जाऊ शकतो. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 120W fast charging टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे ज्यासोबत 33W dock चार्जिंग तसेच reverse charging पण मिळते.

फ्रंट कॅमेरा

सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी Ulefone Armor 26 Ultra 50MP selfie camera ला सपोर्ट करतो. ही एफ/2.25 अपर्चर असलेला 5 पी लेन्स आहे जी 80.4° फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करण्याची क्षमता ठेवतो.

बॅक कॅमेरा

फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉ​ड रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 200MP Samsung HP3 मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 50MP Ultra Wide-angle लेन्स तसेच 64MP Night Vision सेन्सरसह मिळून चालतो. याव्यतिरिक्त फोनच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 3.2x Optical Zoom Telephoto लेन्स पण आहे.

परफॉर्मन्स

हा मोबाईल अँड्रॉईड 13 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली MediaTek Dimensity 8020 चिपसेट देण्यात आली आहे. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 2.6 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी77 जीपीयू देण्यात आला आहे. मोबाईलमध्ये 12GB RAM + 512GB storage मिळते, ज्यासोबत 2TB मेमरी कार्डला सपोर्ट पण आहे.

डिस्प्ले

Ulefone Armor 26 Ultra स्मार्टफोन 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 1080 x 2460 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट प्राप्त होते. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यावर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची लेयर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here