Google Pixel 8a स्मार्टफोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

गुगलने आपल्या पिक्सल 8 सीरिजचा नवीन स्मार्टफोन Google Pixel 8a भारतीय बाजारात लाँच केला आहे. यात युजर्सना टेंसर जी 3 चिपसेट, AI टेक्नॉलॉजी, 120Hz रिफ्रेश रेट असलेला OLED डिस्प्ले, 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 4492mAh ची मोठी बॅटरी सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच हा ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल. चला, पुढे तुम्हाला मोबाईलची संपूर्ण माहिती देत आहोत.

Google Pixel 8a ची किंमत आणि उपलब्धता

 • Google Pixel 8a ला भारतात दोन मेमरी पर्यायामध्ये एंट्री मिळाली आहे. डिव्हाईसच्या 8GB रॅम +128GB स्टोरेजची किंमत 52,999 रुपये आहे. तर 256GB व्हेरिएंट 59,999 रुपयांचा आहे.
 • Google Pixel 8a साठी प्री-ऑर्डर फ्लिपकार्टवर सुरु झाला आहे. तसेच, याची सेल 14 मे ला सकाळी 6:30 वाजता सुरू होईल.
 • प्री-ऑर्डर दरम्यान Pixel 8a बुक केल्यावर Pixel बड्स ए-सीरिज मात्र 999 रुपयांमध्ये दिली जाईल.
 • कलर ऑप्शन पाहता नवीन Pixel 8a ओब्सीडियन, पोर्सिलेन, बे आणि पिवळ्या रंगामध्ये लाँच झाला आहे.
 • ऑफर्स पाहता गुगल पिक्सल 8 ए वर निवडक बँक कार्डच्या मदतीने 4,000 रुपयांची बँक ऑफर आणि नो-कॉस्ट EMI ऑप्शन मिळेल.
 • ब्रँड जुन्या डिव्हाईसला एक्सचेंज केल्यावर 9,000 रुपये पर्यंतची सूट पण देत आहे.

Google Pixel 8a चे स्पेसिफिकेशन

 • 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले
 • Tensor G3 चिपसेट
 • टाईटन M2 सिक्योरिटी चिप
 • 8GB रॅम +256GB स्टोरेज
 • 64MP रिअर कॅमेरा
 • 13MP फ्रंट कॅमेरा
 • 4,492mAh ची बॅटरी
 • IP67 रेटिंग
 • अँड्रॉईड 14

डिस्प्ले: Google Pixel 8a स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1400 निट्स HDR ब्राईटनेस, 2000 निट्स पीक ब्राईटनेस आणि गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे.

प्रोसेसर: हा गुगल स्मार्टफोन Tensor G3 चिपसेटसह लाँच झाला आहे यात टाईटन M2 सिक्योरिटी चिप पण लावण्यात आली आहे.

स्टोरेज: भरपूर मेमेरीसाठी ब्रँडने फोनला 8GB LPDDR5x रॅमसह 128GB आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह बाजारात आणले आहे.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Google Pixel 8a ड्युअल रिअर कॅमेरा आणि LED फ्लॅशसह आहे. यात 64MP चा वाईड कॅमेरा 8x सुपर रेज झूम, ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक फोटो स्टेबिलायजेशन टेक्नॉलॉजीसह येतो. त्याचबरोबर 13MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP ची लेन्स देण्यात आली आहे.

कॅमेरा फिचर्स: Google Pixel 8a कॅमेऱ्यामध्ये मॅजिक एडिटर, बेस्ट टेक आणि ऑडियो मॅजिक इरेजरसह अनेक लोकप्रिय AI फिचर जोडले आहेत. त्याचबरोबर अल्ट्रा HDR मोड पण आहे.

बॅटरी: फोनमध्ये 4,492mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग आणि वायरलेस क्युआय चार्जिंगला सपोर्टसह येते. ब्रँडचा दावा आहे की फोन 24 तासापेक्षा जास्त आणि एक्सट्रीम बॅटरी सेवर सह 72 तासापर्यंत काम करू शकतो.

इतर: डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय 6 आणि इसरोचा NavIC GPS पण आहे. तसेच धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP67 रेटिंग देण्यात आली आहे.

ओएस: Google Pixel 8a अँड्रॉईड 14 सह चालतो. फोनसह तुम्हाला 7 वर्षापर्यंत OS आणि सुरक्षा अपडेटची सुविधा दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here