Categories: बातम्या

एक्सक्लूसिव: लावा घेऊन येत आहे कमी किंमतीती नॉच फोन झेड92 आणि झेडएक्स, शाओमी आणि वीवोला मिळेल टक्कर

गेल्या काही काळात स्मार्टफोन निर्माता कंपन्या मोबाईल फोन यूजर्ससाठी नॉच-डिजाइन असलेले हँडसेट लाँच करत आहेत. पण हा ट्रेंड स्वीकारण्यास भारतीय स्मार्टफोन निर्मात्यांनी थोडा जास्त वेळ घेतला आहे. गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये माइक्रोमॅक्स ने आपला पहिला नॉच असलेला स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता लावा पण नॉच डिजाइन सह लावा झेड92 आणि लावा झेएक्स स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे.

91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच मार्केट मध्ये लावा झेड92 आणि झेडएक्स नावाने स्मार्टफोन्स लॉन्च करू शकते. तसेच आम्ही तुम्हाला डिवाइसच्या ऑफिशियल लॉन्चच्या आधी डिवाइसचे फोटो दाखवत आहोत. समोरून लावाचे दोन्ही फोन एक सारखे असतील.

फोटोच्या आधारावर बोलायचे तर लावाचे हे स्मार्टफोन स्लिम बेजल, नॉच डिजाइन आणि थिक चिन सह सादर होतील. नॉच डिजाइन मध्ये सेल्फी कॅमेरा आणि ईयरपीस असेल. तसेच डिवाइस मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण उजवीकडे असेल.

फीचर्स पाहता लावा झेड92 मध्ये स्क्रीन रेजल्यूशन 1,520 x 720 पिक्सल आणि पिक्सल डेंसिटी 320 डीपीआई असेल. फोन क्वार्ड-कोर मीडियाटेक एमटी6761 प्रोसेसर वर आधारित असेल. सोबत यात 3जीबी रॅम आणि पावरवीआर जीई8300 ग्राफिक्स असेल. डिवाइस एंडरॉयड ओरियो 8.1 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. लावा झेडएक्स पाहता यात ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी6762 प्रोसेसर आणि 4जीबी रॅम सह येईल. या डिवाइसचे स्क्रीन रेजल्यूशन 1,520 x 720 पिक्सल असेल. सोबत डिवाइस एंडरॉयड 8.1 ओरियो वर चालेल. सध्या आमच्याकडे या दोन्ही फोनची इतकीच माहिती आहे. अशा आहे कि दोन्ही डिवाइस 10,000 रुपयांमध्ये सादर केले जाऊ शकतात.

Published by
Siddhesh Jadhav