टेक कंपनी वीवो ने नुकताच भारतीय बाजारात वीवो वी11 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवोचा हा पहिला फोन आहे जो देशात ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. कंपनी ने या डिस्प्ले ला हेलो नॉच चे नाव दिले आहे. वीवो वी11 प्रो च्या लॉन्च सोबतच कंपनी ने सांगितले होते की वीवो या सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन वी11 पण घेऊन येणार आहे. वीवो इंडिया ने या फोन च्या नावा व्यतिरिक्त याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधत माहिती लपवून ठेवली आहे. पण 91मोबाईल्स ने आपल्या सूत्रांकडून वीवो वी11 संबंधीत एक्सक्लूसिव माहिती दिली आहे ज्यात फोनचे स्पेसिफिकेशन्स आहेत.
91मोबाईल्सला समजले आहे की कंपनी वीवो वी11 पण हेलो नॉच डिस्प्ले सह लॉन्च करेल. वीवो वी11 प्रो मध्ये कंपनी ने इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे पण वी11 मध्ये हे फीचर मिळणार नाही तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल. वीवो वी11 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो पण वी11 मध्ये कंपनी मीडियाटेक पी60 चिपसेट देईल.
वीवो वी11 मध्ये 6जीबी रॅम मेमरी देण्यात येईल सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी11 पण डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील. तसेच वी11 च्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर मिळेल. वीवो वी11 कंपनी 23,000 रुपयांपर्यंत लॉन्च करेल.
वीवो इंडिया ने अजूनतरी वी11 च्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च ची माहिती दिली नाही पण आशा आहे की कपंनी येत्या 25 सप्टेंबरला हा फोन इंडियन मार्केट मध्ये येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वी11 कंपनी खासकरून टियर 3 aani टियर 4 शहरांसाठी घेऊन येत आहे आणि आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबताच या फोनच्या सेल चा मेन फोकस आॅफलाईन रिटेल स्टोर्स असतील.
वीवो वी11 ची किंमत आणि लॉन्च डेट समजताच तुम्हाला सांगण्यात येईल. वीवो वी11 प्रो ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा)
साभार : केशव खेडा
















