Samsung फॅन्ससाठी उद्याचा दिवस खूप खास असणार आहे. उद्या म्हणजे 14 जानेवारीला सॅमसंग साल 2021 चा सर्वात मोठा ईवेंट ‘Galaxy Unpacked’ आयोजित करणार आहे. या ईवेंटच्या मंचावरून कंपनीची लेटेस्ट आणि सर्वात पावरफुल ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज टेक मंचावर येईल. सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21 Plus आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च होऊ शकतात. सॅमसंग इंडिया या ग्लोबल ईवेंट सोबत भारतात पण गॅलेक्सी एस21 सीरीज सादर करणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज घेऊन येणारा हा ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ ईवेंट उद्या 14 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू होईल. हा ईवेंट परदेशात आयोजित होईल पण ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा ईवेंट भारतात पण दाखवला जाईल आणि या ईवेंटच्या मंचावरून Galaxy S21 सीरीज भारतात लाॅन्च होईल. लाॅन्च स्ट्रीमिंग सॅमसंग इंडियाच्या यूट्यूब चॅनल वर लाईव बघता येईल. त्याचबरोबर सॅमसंगच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफार्म, सॅमसंग डाॅट काॅम आणि सॅमसंग न्यूजरूम इंडिया वर पण लाॅन्चचे थेट प्रक्षेपण होईल. Galaxy India Unpacked सुरू असताना दर्शकांना काही प्रश्न पण विचारले जातील, ज्यांची योग्य उत्तरे दिल्यास Samsung Galaxy S21 सीरीज सोबत इतर 21 सॅमसंग फोन जिंकण्याची संधी पण मिळेल.
Samsung Galaxy S21 Ultra
लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळू शकतो जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह बाजारात येऊ शकतो. लीकनुसार हा फोन एंडराॅयड 11 वर लाॅन्च होईल तसेच सॅमसंगच्या वनयूआई 3.0 वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. तसेच गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी 40 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो.
लीक झालेले रेंडर्स पाहता फोनच्या सर्व कडा स्लिम बेजल्स सह येतील, तसेच फोन मध्ये सेल्फी कॅमेर्यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आली आहे जो स्क्रीनच्या टॉप सेंटर मध्ये आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन स्क्रीनच्या उजवीकडे आहेत. चर्चा अशी आहे कि या फोनचे डायमेंशन 161.5×75.6×7.85mm असेल. तसेच फोन मध्ये एस पेन सपोर्ट मिळू शकतो, पण या पेनसाठी फोन मध्ये कोणताही विशेष स्लॉट दिला जाणार नाही. येत्या काळात फोन बद्दल अजुन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S21
सॅमसंग गॅलेक्सी एस21 बद्दल बोलले जात आहे की भारतात हा सॅमसंगच्या एक्सनाॅस 2100 चिपसेट सह बाजारात येईल. लाॅन्च नंतर ही सीरीज भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. जिची विक्री 29 जानेवारी पासून सुरू होईल. रिपोर्टनुसार सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर वर आता पासूनच 2,000 रुपये देऊन सीरीजचा कोणताही स्मार्टफोन प्री-बुक करता येईल. मागे एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एफएचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनल वर बनला असेल. तसेच फोन 4,000mAh च्या बॅटरी सह कथितरीत्या 25W पर्यंतच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल. मागील रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर असणार नाही.
Samsung Galaxy S21 Plus
सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. वेबसाइट वर हा फोन एंडरॉयडच्या नव्या ओएस एंडरॉयड 11 सह सर्टिफाइड केला गेला आहे. इथे फोन आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे जो दोन माॅडेल्स मध्ये लाॅन्च होईल. फोनचा एक माॅडेल क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगन 875 चिपसेटला सपोर्ट करेल. तसेच चर्चा अशी आहे कि फोनचा दुसरा मॉडेल एक्सनॉस 2100 चिपसेट सह लॉन्च होईल.
Samsung Galaxy S21+ संबंधित लीक्सनुसार बोलले जात आहे की सॅमसंगचा हा फोन एमोलेड पॅनल वर लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालणार्या स्क्रीनला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोन मध्ये 6.7 इंचाचा एलटीपीएस फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी एस21+ एक 5G फोन असेल जो Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.1 सारख्या फीचर्स सह येईल. तसेच बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,800एमएएचची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस स्मार्टफोन Phantom Silver, Phantom Black आणि Phantom Violet कलर मध्ये बाजारात येईल.
















