Gionee पुन्हा एकदा आपले नवनवीन स्मार्टफोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने लो बजेट वाले Gionee Max भारतात लॉन्च केला होता. तर आता 91मोबाईल्सला गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये नवीन फोन Ginoee M12 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. लिस्टिंग मध्ये Gionee फोनचा मॉडेल नंबर H603B सह लिस्ट केला गेला आहे. गुगल प्ले वर समोर आले आहे कि फोनचे नाव Gionee M12 असेल. हा अपकमिंग स्मार्टफोन M12 Pro चा छोटा वर्जन माना असल्याचे बोलले जात आहे, व चीन मध्ये सप्टेंबर मध्ये लॉन्च केला गेला होता. Gionee M12 ची किंमत आणि लॉन्च डेट बद्दल सध्यातरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण असे म्हणता येईल कि हा एंट्री-लेवल स्मार्टफोन असेल.
लिस्टिंग नुसार Gionee M12 मध्ये MediaTek Helio P22 चिपसेट आणि 4GB रॅम व 6GB रॅम असेल. स्मार्टफोन मध्ये 720p डिस्प्ले आणि फ्रंटला पंच-होल कोपऱ्यात असेल. तसेच Gionee M12 अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.
सध्या जियोनी एम 12 स्पेक्सचे समोर आले नाहीत. फोनच्या लॉन्च डेटची आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाही, पण आम्ही यावर्षीच्या शेवटपर्यंत हा फोन येण्याची आशा करू शकतो.
लक्षात असू द्या कि Gionee M12 Pro मध्ये MediaTek Helio P60 चिपसेट, 128GB इंटरनल स्टोरेज, एक HD + वॉटरड्रॉप डिस्प्ले, 16MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम आणि 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली होती. आपण आगामी आठवड्यांमध्ये फोनच्या लॉन्च डेट, किंमत आणि उपलब्धते सहित अजून पण माहिती लीक होण्याची आशा करू शकतो.














