फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये पिक्सल स्मार्टफोन हिट केल्यानंतर आता गूगलची नजर लो बजेट स्मार्टफोन्स वर आहे. गेल्या काही दिवसांपासून बातम्या पण येत आहेत कंपनी लवकरच नवीन पिक्सल स्मार्टफोन आणणार आहे. गूगलचे हे नवीन पिक्सल स्मार्टफोन पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल चे छोटे वर्जन असतील. अलीकडेच चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पिक्सल 3ए एक्सएल स्मार्टफोन दिसला होता तर आता या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन पिक्सल 3ए पण गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये पिक्सल 3ए चे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
पिक्सल 3ए कि पिक्सल 3 लाइट?
गूगलच्या आगामी स्मार्टफोन्स बद्दल प्रश्न असा होता कि कंपनी आपले स्वस्त डिवाईसेज कोणत्या नावाने बाजरात आणेल. अनेक लीक्स मध्ये या स्मार्टफोन्सची नावे गूगल पिक्सल 3 लाइट आणि पिक्सल 3 एक्सएल लाइट असल्याचे सांगण्यात येत होते तर अनेक लीक्स मध्ये पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल बोलले जात होते. गीकबेंचच्या या लिस्टिंग ने या प्रश्नाचे उत्तर देत सांगतिले आहे कि गूगल आपले स्वस्तातले स्मार्टफोन्स पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल नावांसह लॉन्च करेल.
महत्वाचे स्पेसिफिकेशन्स आले समोर
गीकबेंच वर पिक्सल 3ए 2जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगितले आहे. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि गूगलचा हा आगामी स्मार्टफोन किमतीच्या बाबतीती कमी जरी असला तरी एंडरॉयडच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 10 सह लॉन्च होईल. तुम्ही ऐकून हैराण व्हाल कि एंडरॉयड 10 आतापर्यंत ऑफिशियली लॉन्च पण झालेल्या नाही. अर्थात् पिक्सल 3ए सोबतच हा एंडरॉयड चा हा नवीन ओएस पण बाजारात येईल.
48-एमपी कॅमेरा असेलेल्या वाले ओपो आर19 चा फोटो लीक, फोन मध्ये असेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा
गूगल पिक्सल 3ए गीकबेंच वर ऑक्टा-कोर प्रोसेसर सह एमएसएम8953 चिपसेट ने सुसज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चिपसेट क्वालकॉमचा आहे ज्याला स्नॅपड्रॅगॉन 625 पण म्हटले जाते. स्कोर पाहता पिक्सल 3ए ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 732 स्कोर देण्यात आला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये हा फोनला 3184 स्कोर मिळाला आहे. विशेष म्हणजे गीकबेंच वर पिक्सल 3ए काल म्हणजे 10 फेब्रुवारीला लिस्ट केला गेला आहे.
गूगल पिक्सल फोन आतापर्यंत हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह फ्लॅगशिप रेंज मध्ये लॉन्च होत होते तर पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल कंपनी लो बजेट मध्ये लॉन्च करेल. अलीकडेच सॅमसंगच्या एम सीरीज ने शाओमीआला मोठी टक्कर दिली आहे त्यात आता गूगलचे आगामी पिक्सल फोन पण लो बजेट मध्ये शाओमीला चांगली स्पर्धा देतील. गूगलचे आगामी पिक्सल गीकबेंच वर लिस्ट झाल्यांनतर बोललेलं जात आहे कि गूगल लवकरच पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल सादर करेल.
