48-एमपी कॅमेरा असेलेल्या वाले ओपो आर19 चा फोटो लीक, फोन मध्ये असेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा

91मोबाईल्स ने गेल्याच आठवड्यात ओपो बद्दल एक्सक्लूसिव बातमी दिली होती कंपनी आपल्या एफ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा एफ11 प्रो नावासह लॉन्च करेल. ओपो एफ11 प्रो 32-मेगापिक्सलच्या सेल्फी आणि 48-मेगापिक्सलच्या रियर कॅमेरीसह येईल जो येत्या 20 फेब्रुवारीला भारतात लॉन्च केला जाईल. ओपो एफ11 प्रो च्या लॉन्चच्या आधीच कंपनीच्या अजून एका नवीन स्मार्टफोन आर19 ची माहिती पण समोर आली आहे. एका लीक मध्ये ओपो आर19 चा फोटो शेयर केला आहे ज्यात फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे.

अशी असेल डिजाईन

ओपो आर19 पहिल्यांदा बघताना ओपो एफ11 प्रो सारखा वाटतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले वर कोणताही कॅमेरा सेंसर किंवा नॉच देण्यात आलेली नाही. लीक मध्ये आर19 च्या सेल्फी कॅमेऱ्याची माहिती देण्यात आलेली नाही पण फोटो बघून समजते कि हा स्मार्टफोन ओपो एफ11 प्रो प्रमाणे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याने सुसज्ज असेल. ओपो आर19 चा फ्रंट कॅमेरा सेल्फी कमांड दिल्यावर फोन बॉडी मधून बाहेर येईल.

आर19 प्रो च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच आर19 पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. दोन्ही फोनचा रियर कॅमेरा सेटअप एक सारखा दाखवण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर मधोमध आहे. या ओपो एफ11 प्रो मध्ये कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे पण ओपो आर19 च्या फोटो मध्ये रियर फिंगर​प्रिंट सेंसर दिसत नाही. त्यामुळे असे वाटते कि आर19 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी

48-एमपी कॅमेऱ्याची असेल ताकद

ओपो आर19 च्या समोर आलेल्या फोटो मध्ये फोन सोबत 48-मेगापिक्सल पण लिहिलेले आहे. बोलले जात आहे कि ओपो आर19 मध्ये पण ओपो एफ11 प्रो प्रमाणे 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देईल जाईल. ओपो आर19 मध्ये डुअल कॅमेऱ्याची ताकद 48-मेगापिक्सल असेल कि ​रियर कॅमेरा सेटअपचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा असेल हे अजून समजले नाही.

स्पेसिफिकेशन्स पण असतील दमदार

ओपो आर19 बद्दल आतापर्यंत आलेल्या लीक्सनुसार कंपनी हा फोन 6जीबी रॅम सह बाजरात आणेल. तसेच या फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. बोलले जात आहे कि ओपोचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल. ओपो ने अजूनतरी आर19 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण अशा कि इंडिया मध्ये एफ11 प्रो लॉन्च झाल्यानंतर कंपनी ओपो आर19 पण चीनी मध्ये सादर करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here