सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी

सॅमसंगने आपली बहुप्रतीक्षित गॅलेक्सी एम सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे बाजारात येताच हिट झाले आहेत. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सध्या फक्त भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध आहेत जे येत्या काही दिवसांत देशातील इतर बाजारांत सादर होतील. या दोन स्मार्टफोन्स सोबत गॅलेक्सी एम30 बद्दल पण अनेक लीक्स समोर आले आहेत आणि त्यातच आता गॅलेक्सी एम30 चा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम30 चा फोटो प्राइजकार्ट द्वारा शेयर केला गेला आहे. या फोटो मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. गॅलेक्सी एम30 च्या फोटो मध्ये फोनच्या डिजाईन सोबतच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. लीक झालेल्या फोटो वरून गॅलेक्सी एम30 च्या कॅमेरा सेटअप सोबतच फोन डायमेंशन्स, पोर्ट आणि सेंसर्सची माहिती सांगण्यात आली आहे.

डिजाईन

गॅलेक्सी एम30 चा फ्रंट पॅनल पाहता हा फोन ‘वी’ शेप वाल्या नॉच सह सादर केला जाऊ शकतो आहे. फोनच्या तीन किनार पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तसेच खालच्या बाजूला थोडा बॉडी पार्ट आहे. हा फोन कंपनी द्वारा इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर डाव्या बाजूला वर आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लश लाईट देण्यात आली आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. माइक्रोफोन फोनच्या वर आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. गॅलेक्सी एम30 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

कॅमेरा सेटअप

गॅलेक्सी एम30 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तसेच एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी गॅलेक्सी एम30 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये 2220 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.38-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड असेल. हा फोन कंपनी द्वारा 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येईल. बोलले जात आहे ​कि गॅलेक्सी एम30 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह सॅमसंग एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे हाच चिपसेट सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये पण देण्यात आला आहे.

या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती

सॅमसंग गॅलेक्सी एम30 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोनच्या लीक फोटो मध्ये फोनच्या डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. सध्या गॅलेक्सी एम30 चे हे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोनची घोषणा करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here